छत्रपती संभाजीनगर :- गेल्या कित्येक वर्षांपासून चिखली - बुलढाणा येथे योग प्रशिक्षक म्हणून सेवारत तथा आईकडून, दीन दुबळ्या, अनाथ, अपंग, निराधार, ज्येष्ठ नागरिक तसेच विधवा, परित्यक्ता व बेरोजगारांना शासकीय सवलती मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रभर गाजलेल्या आधार संघटनेचे अध्यक्ष मा. बबनराव देवढे गुरूजी, चिखली यांची तर वडीलांकडून वाशिम परगण्यातील तत्कालीन श्रीमंत चंद्रभान काटेकर यांची नात असलेल्या आणि सध्या चिखली - बुलढाणा परीसरात योग प्रशिक्षण तथा निसर्गोपचार द्वारे सामाजिक दृष्ट्या कार्यरत डॉ. तृप्ती विलासराव काटेकर ( सौ. तृप्ती दीपक महाले ) यांना नुकतेच, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए. जी. एम्. ए. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल ( अजित दादा पवार गट ) आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बहुमानाच्या योग रत्न पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर येथे दि. २२-०६-२०२५ रोजी सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार त्यांना छ. संभाजीनगर येथील विख्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित भव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिक्षण सम्राट म्हणून ख्यातनाम असलेले राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांच्या हस्ते तर डॉ. सतीष कराळे आ. इं. मे. अ. चेअरमन, डॉ. नितीन राजे पाटील व्हाईस चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल आयुष विभाग चे प्रदेश कार्याध्यक्ष, डॉ. बाबुराव कानडे, उद्योजक मनोज दांडगे, दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, प्रा. कुणाल महाजन, मनोहर कानडे तथा ए. आय. एम्. ए. चे इतर पदाधिकारी तसेच बहुतांश योग प्रशिक्षक व योग थेरपिस्ट अशा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात येवून भावी यशवंत वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
________________________
Post a Comment