स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरणार !
दौंड (बबनराव धायतोंडे) :- आगामी पुणे जिल्हा परिषद,दौंड पंचायत समिती आणि दौंड नगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणूकां संदर्भात पक्ष
पातळीवर नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची महत्त्वाची बैठक गुरुवार (दि.२६) जुन २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा दौंड येथे आयोजित केलेली आहे.
अशी माहिती दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी दिली.
यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ. जगन्नाथ बापू शेवाळे जिल्हाध्यक्ष, महादेव कोंढारे कार्याध्यक्ष,सौ.भारतीताई शेवाळे महिला जिल्हा अध्यक्षा,कु.दुर्गाताई चोरगे युवती जिल्हाध्यक्षा,रमेश (आप्पा)थोरात, मा.आमदार दौंड,नामदेव ताकवणे प्रदेश सरचिटणीस,सोहेल खान जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग,अतुल राऊत जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल,देवदत्त निकम कार्याध्यक्ष,पुणे,रामभाऊ टुले,उपाध्यक्ष,पुणे जिल्हा प्रमोदसिंह गोतारणे युवक जिल्हा अध्यक्ष,सागर बाबा मिसाळ जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,ईत्यादी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच दौंड तालुक्यातील सर्व सेलचे अध्यक्ष व त्यांच्या कार्यकारिणीतील सर्व सदस्य तालुक्यातील प्रमुख नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रामुख्याने जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती गणातील आणि नगरपालिका वॉर्डातील सर्व इच्छुक उमेदवार यांनी बैठकीसाठी वेळेत हजर रहावे असे अवाहन आप्पासाहेब पवार अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार दौंड तालुका यांनी केले आहे.
_______________________
Post a Comment