ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन

This get from this site or source
लोकनेता न्युज नेटवर्क

गोवा :- आपल्या कणखर आवाजाने सिनेमाचा पडदा गाजवणारा आणि मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त मातीसाठी, तेथील बळीराजासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारा एक सच्चा समाजभान जपणारा कलाकार आज हरपला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रख्यात व दिग्गज अभिनेते, लेखक आणि चित्रपट निर्माते विश्वनाथ उर्फ नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

      गोव्यातील डोना पावला येथील राहत्या घरी गुरुवारी सकाळी ते बेशुद्धावस्थेत आढळले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या या अकस्मात जाण्याने मनोरंजन क्षेत्रासह राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड शोककळा पसरली आहे.

       केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाचे संकट पाहून नानांचे मन हेलावले होते. त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या सोबतीने 'नाम फाउंडेशन'ची स्थापना करून मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प, नाला खोलीकरण आणि गाळ काढण्याच्या कामात प्रत्यक्ष जागेवर जाऊन अहोरात्र श्रमदान केले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन करणे आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पाहणारा हा 'नाना' नावाचा अवलिया कायमचा निघून गेल्याने आज मराठवाड्यातील बळीराजा पोरका झाला आहे.

       हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी आपल्या रांगड्या आणि रोखठोक संवादांनी एक वेगळाच सुवर्णकाळ निर्माण केला. परिंदा, क्रांतिवीर, तिरंगा, अग्निसाक्षी, गुलाम-ए-मुस्तफा, वेलकम या हिंदी चित्रपटांसह मराठीतील नटसम्राट, माफीचा साक्षीदार, देऊळ आणि डॉ. प्रकाश बाबा आमटे यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना ३ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले असून भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्कारानेही सन्मानित केले होते.

     आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी आणि अथांग दातृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या या महान कलावंताला संपूर्ण महाराष्ट्राकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

________________________

0/Post a Comment/Comments