लोकनेता न्युज नेटवर्क
कोल्हापूर :- अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या बहुजन साहित्य संघ, चिखली च्या ज्येष्ठ पदाधिकारी तसेच गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून सामाजिक व जनसेवेच्या क्षेत्रात समर्पित भावनेने कार्यरत तथा केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्लीच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. शालीनी अरूण काटोले, चिखली यांना, त्यांच्या अखंड सेवाभावी कार्याची कटाक्षाने दखल घेऊन, मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दिक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर तर्फे बहुमानाचा समजल्या जाणाऱ्या " राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार - २०२५ " या पुरस्काराने, दि. २9-०६-२०२५ रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर, राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथील भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रा. शालीनी काटोले या सुप्रसिद्ध श्री. शिवाजी शिक्षण संस्था, चिखली च्या विज्ञान महाविद्यालया मधील विभाग प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झालेल्या असून एक निस्वार्थ आणि सेवाव्रती कार्यकर्ता या नात्याने त्यांची सर्वत्र ओळख असून त्यांना या अगोदर सुध्दा विविध संस्था व मंडळे यांच्या कडून अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलेले असून या गौरवशाली पुरस्काराने त्यांच्या किर्तीमानात मोलाची भर पडली आहे व त्यामुळेच राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
________________________
Post a Comment