मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात होणार प्रवेश...
लोकनेता न्यूज नेटवर्क
इंदापूर (बबनराव धायतोंडे) :- राज्यातील राजकीय समीकरणे सतत बदलत असप्रविण मानेंचा बुधवारी भाजप पक्ष प्रवेश निश्चित !
इंदापूर तालुका देखील राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इंदापूर तालुक्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रथमच तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये महायुती एकत्र लढल्यास क्रिडा मंत्री दतात्रय भरणे आणि प्रविण माने एकत्र येऊन निवडणूक लढविणार असे देखील बोलले जात आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार प्रवीण माने भाजपमध्ये प्रवेश करणार हे आता निश्चित झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर माने यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. दि.२ जुलै रोजी मुंबई येथील पक्ष कार्यालयात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती त्यांचा दिमाखदार पक्षप्रवेश सोहळा निश्चित होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांचे अतिशय निकटवर्तीय असलेल्या एका बड्या राजकीय नेत्यानी हि माहिती लोकनेता शी बोलताना दिली आहे.
प्रविण माने हे भाजपमध्ये गेल्यास इंदापूरच्या राजकारणात अधिक रंगत येणार असून सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि प्रविण माने असा परत एखदा तिरंगी सामना इंदापूरकरांना पाहायला मिळेल.
नवीन समीकरणांची नांदी....
मागील विधानसभा निवडणुकीत प्रविण माने यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.त्यांच्या नेतृत्वाला आणि तालुक्यातील जनसंपर्काला मोठा प्रतिसाद मिळाला होता.अपक्ष निवडणूक लढवलेले प्रविण माने यांनी ४० हजारांच्या आसपास मतदान घेतले होते,आता त्यांच्या भाजप प्रवेशामुळे इंदापूरच्या राजकारणात नवं समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
चौकट......
मुख्यमंत्री यांचे इंदापूरवर विशेष लक्ष..
नीरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या मातीवर,माणसांवर,आणि जनतेवर वेगळे प्रेम आहे,असे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय यांनी सांगितले आहे. राज्यात व देशपातळीवर भाजप मजबूत होत असल्याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात देखील भाजप मजबूत करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यान माने यांना भाजप प्रवेशाचे दि. २ जुलै रोजी निमंत्रण दिल्याचे सांगितले आहे.
भाजपला प्रविण माने यांच्यासारखा तगडा युवक नेता मिळणार असल्याने आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये इंदापूर तालुक्यात भाजप आपले वेगळे स्थान निर्माण करू शकते.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये म्हणजेच काही दिवसातच या संदर्भात इंदापूर तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी होतील,अशी राजकिय स्थिती निर्माण झाली आहे.
परंतु याचा राजकीय फायदा मात्र क्रिडा मंत्री दतात्रय भरणे यांनाच होईल असे जानकार राजकीय मंडळी बोलत आहेत.
चौकट
बुधवार दि. २ जुलै रोजी मुंबई येथील पक्ष कार्यालयात माझा पक्ष प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार राहुल (दादा)कुल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
मा.प्रविण दशरथ माने
युवा नेते इंदापूर.
________________________
Post a Comment