शाहू राजा, शाहू राजा, शाहू राजा मायबापा ss
वंचितांची वंदना पायी तुझ्या रे ss - धृ.
कालचे आम्ही जे
नाकारलेले !
गुलामीच्या शृंखलांनी
बध्द ठेवलेले !!
डोळे असोनी अंधारलेले !
वाचा असोनी जीभ कापलेले !!
वाचा असोनी जीभ
कापलेले.....
नजरेस आले केवळ तुझ्या
शाहू राजा ss - १.
युगांचे उपाशी पाहिलेस जेव्हा !
हुंदके तयांचे ऐकलेस तेव्हा !!
हाल शोषितांचे जाणलेस जेव्हा !
आरक्षित हक्क तयांचे
केलेस तेव्हा !!
आरक्षित हक्क तयांचे
केलेस तेव्हा.....
असा लोकराजा नाही दुजा
शाहू राजा ss - २.
महाराचा पोर एकं मॅट्रिक झाला !
कळताच भेटीसाठी धावून गेला !!
पाहताच बाळ भिमाला
अचंबित झाला !
दलीतांचा वाली आला
बोलून गेला !!
दलीतांचा वाली आला
बोलून गेला.....
वेध भविष्याचा नयनी तुझ्या
शाहू राजा ss - ३.
तुझ्या विचारांची पेटती मशालं !
घेवूनिया पुढे निघाला
रामजी चा लालं !!
मूलभूत हक्कांची करूनिया ढालं !
संविधान देशाला केले बहालं !!
संविधान देशाला केले बहालं.....
काव्य कस्तुरेचे पायी तुझ्या
शाहू राजा ss - ४.
रचना :- डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली, बुलढाणा.
________________________
Post a Comment