प्रखर राष्ट्रभक्ती, दुर्दम्य आत्मविश्वास आणि महापराक्रमाचे मुर्तिमंत प्रतिक म्हणजे महाराणा प्रताप ! - ॲड. विजयकुमार कस्तुरे

लोकनेता न्युज नेटवर्क

चिखली :- स्थानिक वकील संघ, चिखली च्या वतीने, सोळाव्या शतकात मोगल बादशहा अकबराच्या विशाल साम्राज्याशी सातत्याने झुंज देऊन त्याच्या लाखोंच्या सैन्याला जेरीस आणून, मोगल साम्राज्यासमोर कधीही न झुकणाऱ्या महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त
आज दि.२९-०५-२०२५ रोजी, त्यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन ज्येष्ठ वकील विजयकुमार कस्तुरे यांचे हस्ते तथा वकील संघाचे मा. अध्यक्ष सागर सोनाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, करण्यात येवून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉ. कस्तुरे यांनी उपरोक्त उदगार काढून महाराणा प्रतापसिंह यांच्या महान जीवन चरित्र तथा कार्याची माहिती सांगून, महापुरुषांच्या गुणगौरव सोहळ्यांमधून त्यांच्या चरित्रग्रंथांचे वाटप करून असे सोहळे साजरे होणे आवश्यक आहे असेही आवाहन सर्व मान्यवरांना केले. या कार्यक्रमात ॲड. बाळासाहेब वानखेडे तथा ॲड. रूपाली यांनी सुध्दा आपले विचार मांडले. ॲड. किरणकुमार हनवते यांनी सूत्रसंचालन तर ॲड. बनकर यांनी आभार व्यक्त केले. सोहळ्यास मा. वकील विजय सरदार, धुरंधर, जे.पी. विणकर, जयश्री कुटे, विजया पाटील, जी. एल्. वानखेडे, राऊत, सुनील अवसरमोल, विजय वानखेडे, संजय पवार व कारकून इ. मंडळी हजर होती.
________________________

0/Post a Comment/Comments