विहिरीतील विद्युत तारेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू

लोकनेता न्यूज नेटवर्क

देगलूर/लक्ष्मी मनधरणे :-  विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथील मंगेश पाटील (वय २१ वर्षे) या युवकाचा चुकून विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.ही घटना दि.१८ जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
      वन्नाळी-शहापूर रस्त्यापासून कांही अंतरावर वन्नाळी येथील भुजंगराव पाटील यांची मोठी विहीर आहे.परिसरातील अनेक युवक रोज या विहिरीत अंघोळीसाठी, पोहण्यासाठी येतात. याच विहिरीवर नेहमीप्रमाणे वन्नाळी येथील मंगेश बालाजी पाटील(वय २१ वर्षे) हा युवक गावातील गजानन विश्वनाथ पाटील, ऋषिकेश केशव उमाटे, उमाकांत हणमंतराव पाटील या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला.कपडे काढून त्याचा हात चुकून विद्युत प्रवाह सुरू असलेल्या विहिरीतील विद्युत मोटारीच्या तारेला लागला.त्यामुळे त्याला जोराचा शॉक लागून तो जागीच गतप्राण झाला.मयत मंगेश पाटील हा नायगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत द्वितीय वर्षात शिकत असल्याचे त्याच्या नातेवाईकाकडून सांगण्यात आले.सदर प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्याचे पो .हे.काॅ.परशुराम इंगोले,पो.काॅ.रामेश्वर भदाडे यांनी केला असून. देगलूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा त्याच्यावर वन्नाळी येथे अंतिम संस्कार करण्यात आले.मंगेशच्या निधनामुळे वन्नाळी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

0/Post a Comment/Comments