बिड | प्रतिनिधी :- जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या तालमीत तयार झालेलं नेतृत्व आर.टी.देशमुख यांचे आज सायंकाळी ५ वाजता बेलकुंड औसा येथे झालेल्या भिषण अपघातात दुःखद निधन झाले आहे...!
पावसामुळे हायवेवर साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चालकाचा ताबा सुटला व गाडीने तीन ते चार वेळा पलटी मारली यात आर.टी.देशमुख गंभीर जखमी झाले...!
त्यांना तातडीने लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला..!
त्यांच्या निधनाने बीडसह संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत असून लोकनेते स्व.मुंडे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता हरपल्याच दुःख होत आहे...!
________________________
Post a Comment