प्रहारचे सादेक इनामदार यांच्यावर खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी पोलिस प्रशासनास निवेदन
शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटिल यांची चौकशी करुण तात्काळ निलबिंत करा-हनुमंत तोंडे
लोकनेता न्यूज नेटवर्क
इंजि. सादिक इनामदार, राष्ट्रीय अध्यक्ष,भ्रष्टाचार निर्मुलन समिती यांच्यावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. बीड श्रीमती प्रियाराणी पाटील यांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा.
सादिक इनामदार एक सामाजिक कार्यकर्ते असून भ्रष्टाचार निर्मुलनाचे काम करतात. त्यांनी बीड जिल्हा जिल्हा परिषद येथील शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आणलेला आहे. त्याचे पडसाद विधानसभेत देखील उमटले आहेत. त्याचा राग मनात धरून नवनियुक्त शिक्षणाधिकारी (माध्य) जि. प. बीड श्रीमती प्रियाराणी पाटील यांनी शिक्षक भरती घोटाळ्याचे प्रकरण दडपण्याच्या उद्देशाने आणि सादेक इनामदार यांच्यावर दबावतंत्राचा वापर करून त्यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्हामध्ये कुठलेही तथ्य नाही.
सादेक इनामदार यांनी बीड जिल्ह्यातील यापूर्वी अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणलेले आहे. व ते निस्वार्थपणे गोर गरीब लोकांचे कामे करतात. त्यामुळे त्यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा व खोटे गुन्हा दाखल करणाऱ्या शिक्षणाधिकारी (मा.) जि. प. बीड श्रीमती प्रियाराणी पाटील यांची चौकशी करुन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रहारचे जिल्हा सरचिटणीस हनुमंत तोंडे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
Post a Comment