साकडं.....

This get from this site or source
लोकनेता न्युज नेटवर्क

पांडूरंगा सोडा 
आता तरी वीटं 
या भक्ताच्या 
झोपडीत नीटं - धृ.

नाही दार नाही 
छत झोपडीला !
तरी भेटीची 
वढं बापडीला !!
आता तुम्हीच
काढा वारी थेटं.....या - १.

किती युगं डोळे 
मिटून बसावं !
थोडं आम्हालाबी 
ध्यानात घ्यावं !!
वारकऱ्याचं 
धरूनीया बोटं.....या - २.

तुळशी वृंदावन 
एकदा पहाना !
घेवूनीया डोई 
वर दाखवाना !!
तोल सावरून 
धरा बिगी वाटं.....या - ३.

शेजाऱ्यानं दोरी 
घातली गळ्यातं !
एक काळी कुप्पी 
एकाच्या दारातं !!
मी बी कौरकं
बोलू सांगा खोटं.....या - ४.

रचना - डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली.....
________________________

0/Post a Comment/Comments