निसर्गाचा समतोल विस्कटतोय, तो केवळ मानवाच्या कृर करणीमुळे !

झाडे ही केवळ पर्यावरण संवर्धनासाठी नव्हे तर माणसाला जगण्यासाठीही गरजेची  ! 

This get from this site or source
लोकनेता न्युज नेटवर्क
          गेल्या एक दोन आठवड्या पासून 45 - 46 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढत गेल्याचे दिसून येत आहे. आणि सहज दिवसभर फिरणारी माणसं दुपारी दिसेनाशी झाली. ती केवळ वाढत्या तापमानामुळे. साधारणपणे 30 - 35 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपण जगू शकतो पण तेच तापमान वाढलेलं असेल तर जगायचं कसं हाच प्रश्न जगातील सर्व नागरिकांना समोर आहे. नव्हे सर्व सजीवांसमोर आहे. पण तापमान असे का वाढले किंवा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असे काय आहे ? याचा आपण कधी विचार केलाय काय?   
       सहज झाडाखाली बाज टाकून गप्पा मारत मारत दिवसा एक झोप काढणाऱ्या आमच्या आजी वर वाढणाऱ्या तापमानाचा काहीही बद्दल जाणवत नाही. का तर गावात आज सुद्धा शेतकऱ्यांनी घरापुढील असोत की मग गुरांच्या गोठ्यासमोरील, झाडे टिकवून ठेवलीत. आणि त्याच झाडाखाली आज त्यांची गुरेढोरे, लहान लेकरे दिवसभर किलबिलाट करतांना दिसतात. 
       गावात झाड आहे शेतात झाड आहे मग झाडांची कत्तल झाली तरी कुठे ? तुम्ही आज सुद्धा आमच्या खेड्या गावात बघा अनेक झाड दिसतील. मोजकी झाड तोडल्या गेलीत ती पण त्यांच्या वाढत्या वयानुसार आणि काळाच्या गरजे नुसार नाईलाजाने ती तोडावी लागलीत. हे ही तितकेच खरे. पण मग झाडांचे प्रमाण कमी झाले ते कसे ? आपण मोठी पडायला आलेली झाडे तोडली खरी पण त्या ठिकाणी आपण दुसरी झाड किती जणांनी लावली. त्यात बोटावर मोजण्याइतके सुद्धा नागरिक नसतील. आपण तोडत आलो पण लावायचे विसरलो. काही झाड शेती उपोयोगा साठी तोडल्या गेली तर काही तस्करांनी चोरून नेली असे अनेक झाडांचे जीव मागील काही वर्षात गेले. आणि आता त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागत आहेत. ते आता सर्वांच्या लक्षात येतांना दिसत आहे.
___________________________________

शहरीकरणात हजारो झाडे गेलीत 

This get from this site or source
लोकनेता न्युज नेटवर्क
          शहरे विकसित झाली शहराच्या कडेने मोठमोठ्या कंपन्या दिसू लागल्यात, त्यांना जोडण्यासाठी रस्ते केल्या गेले. आणि त्याच कंपन्या - रस्ते करत असतांना मध्ये आलेली झाडे कोणताही विचार न करता बिंधास्त तोडली गेली. मात्र त्या ठिकाणी तोडलेल्या झाडांच्या बदल्यात झाडे लावली किती याचा सखोल विचार कोणी केलाय का? की झालेल्या रस्त्याचे देखावे जगाला सांगत हिंडलात. आज तोडली तितकीच झाडे लावली असती तर  46° तापमान वाढलेलं नसतं.
___________________________________

महामार्गात लाखो झाडे  विकत घेऊन शासनाने तोडली

This get from this site or source
लोकनेता न्युज नेटवर्क
         देशात अनेक महामार्ग झालेत त्यात अवघ्या काही वर्षा अगोदर समृध्दी महामार्ग आमच्या नाकाच्या शेंड्याजवळून गेला. भल्यामोठ्या महामार्गाने कितीतरी माणसे मारली ते ही महत्वाचे. हा महामार्ग होत असताना शासनाने शेतमालकांना जमिनी सोबत जमिनी वरील झाडांचे देखील पैसे दिलेत. आणि त्या झाडांची कत्तल करून तिथे मोठा महामार्ग बनवला महामार्ग बनवला हे चांगलेच आहे पण तोडलेल्या झाडांचे काय? जितकी झाडे तोडली मात्र तितकी लावली का झाडांच्या किमती मोजल्या मात्र झाडे लावण्याचा करार पैसे दिलेल्या शेतकऱ्यांकडून करून घेतला असता तर सोपे झाले नसते का?  याचा फायदा शेतकऱ्यांसह पर्यावरणाला झाला नसता का? केवळ तोडण्यात येणाऱ्या झाडांची रक्कम रोखून ठेवली असती तर त्या पेक्षा ही दोन पट झाडे लावल्या गेली असती आणि आज पर्यावरण सुरक्षित राहिले असते.
___________________________________

55 - 60 डिग्री सेल्सिअस मध्ये माणस जगेल का ?

This get from this site or source
लोकनेता न्युज नेटवर्क
      आज 45 डिग्री सेल्सिअस मध्ये माणसांची जीव चाललेत. उन मात्र कमी होण्याचे संकेतच नाहीत ! तज्ञ लोक वारंवार उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मार्ग दर्शन करत आहेत. आणि यावर्षी नेहमीपेक्षा अधिक तापलेले वातावरण आपल्या सर्वांना जाणवत आहे. आणि याचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. लहान असोत की वृध्द की मग तरुण सर्व जण या तापणाऱ्या उन्हाने उकडून निघत आहे. आणि हेच तापमान 50 - 60° झाले तर काय ? पाण्याच्या शोधात असणारी माणसे आणि मुके जीव, हा मनात काहूर उठविणारा विषय आहे. याकडे सर्वाचे लक्ष वेधले गेले पाहिजे.
___________________________________

वेळ अजून सुद्धा गेलेली नाही

लोकनेता न्युज नेटवर्क
          झाडे लावा झाडे जगवा ! हा मोलाचा संदेश शासन आपल्या सर्वांना देत आलंय ते कितेक वर्षा पासून. पण हरामखोर व भ्रष्टाचारी लोकांनी ही झाडे लावण्या अगोदरच खाल्ली असे अपरिहार्यपणे म्हणावे लागते. आणि विचारी लोक त्याचे समर्थनही करतील. शासनाने अनेक योजना सुरू केल्या, वनविभागाने झाडे लावली असे म्हणतात. पण मग ती लावलेली झाडे गेली कुठे? आम्ही लहान असल्यापासून आजतागायत आमच्या रस्ताने झाडे लावण्यात आली आणि हे सर्व वाटसरू लोकांना माहिती आहे. कधी कधी पाण्याचे टँकर झाडांना पाणी द्यायला आले पण ते खाली कुठे झाले हेच कोणाला कळाले नाही. आणि 10 वर्षाच्या कालखंडात आता कुठे तिथे झाडे दिसायला लागली तीही कधी पर्यंत दिसेल सांगता येत नाही. मी तर म्हणेल आपल्या शासनाची भूमिकाही या बाबतीत म. गांधींच्या त्या तीन माकडांसारखी आहे. वनीकरणातील भ्रष्टाचार पहा पण डोळेझाक करा ! ऐका पण बहिऱ्याचे सोंग घ्या ! आणि काही होवो,त्यावर बोलू नका ! कारण हमाम मे सब --  है ! आणि ताण म्हणजे आपलेच सगेसोयरे आहेत. मै भी खाता,तू भी खा !पण, मेरी भी चूप,तेरी भी चूप !म्हणून तर भ्रष्टाचाऱ्यांच्या हाती कारभार देतात आणि मोकळे होतात. शासनाने लावलेल्या झाडांपैकी 30% झाडे जरी जगली असती तरी ती माणसांना जगण्यापुरती झाली असती. तिकडे सयाजी राव शिंदे हा माणूस झाडे लावण्यात मग्न आहे. पण आपण कत्तल करणे बंदच करणार नसू तर त्याचे काय ? बघा अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. त्यासाठी एक तरी झाड आपल्या स्वतः साठी लावा ! हीच काळाची गरज आहे !
___________________________________

•ज्ञानेश्वर सुरेश बुधवत
    मुख्यसंपादक दैनिक लोकनेता
    संस्थापक - विश्व फाउंडेशन म. राज्य
    मातृतीर्थ_सिंदखेड राजा
    मो. न. 9960209149
___________________________________

0/Post a Comment/Comments