नवीन साखर कारखाना व बाय प्राॅडक्ट निर्मिती करणार - कवळे गुरुजी

लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (बाजीराव गायकवाड) :- व्हि पी के उद्योग समूहातील एम व्ही के ॲग्रो साखर कारखाना कुसुमनगर वाघलवाडा चे विस्तारीकरण करून ५००० मे टन प्रती दिवस गाळप क्षमतेचा नवीन साखर कारखाना व बाय प्रॉडक्ट निर्मिती करणार असल्याचे कवळे गुरुजी यांनी सांगितले.व्हि पी के उद्योग समूहातील एम व्ही के ॲग्रो साखर कारखाना वाघलवाडा हा कै डॉ शंकररावजी चव्हाण साहेबांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून कै आ लक्ष्मणरावजी हस्सेकर साहेब यांच्या अथक परीश्रमाने उभारण्यात आला.त्या कारखान्यास आता चाळीस वर्ष पूर्ण होत आले आहेत आणि तेव्हा वापरण्यात आलेली मशनरी त्याकाळात योग्य होती परंतु आता तो कारखाना चालवत असताना वारंवार अडचणी येत आहेत आणि जो साखर उतारा मिळायला हवा तो मिळत नाही.बाग्यास मध्ये रस अधिकचा जाऊन नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यात वापरण्यात आलेले बॉयलर कमी क्षमतेचे असून ते अधिकचा बग्यास खातात त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे आणि मनुष्यबळ अधिक लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होत आहे आणि माघच्या चाळीस वर्षात मशनरी मध्ये मोठा बदल होऊन आता अत्याधुनिक टेक्नॉलॉजी बाजारात आली आहे त्यामूळे आधुनिक टेक्नॉलॉजीचा नवीन कारखाना उभारून त्यात साखरे सह वीजनिर्मिती, इथेनॉल,बायोगॅस या सारखे बाय प्रॉडक्ट तयार केले तरच आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे शक्य होणार आहे याचा विचार करून व्हि पी के उद्योग समूहाचे चेअरमन मा श्री मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी देशभरात फिरून अनेक कारखान्यांना भेटी देऊन त्याचा अभ्यास करून नवीन कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च लागणार आहे त्या अनुषंगाने आर्थिक नियोजन करत असताना १०% रक्कम शेतकऱ्याकडून जमा करावी लागणार आहे आणि ३०% रक्कम स्वतः कारखानदार गुंतवणूक करणार आणि उर्वरित ६०% रक्कम बँकेकडून कर्ज घेऊन वित्त पुरवठा करून पुढील गाळप हंगामात नवीन कारखाना गाळपास सज्ज करायचा आहे.

    शेतकऱ्यांकडून जी १०% रक्कम गोळा करायची आहे त्या साठी एकूण चाळीस हजार सभासद करायचे आहेत आणि सभासद ठेव रक्कम १००००/- रु प्रती एकर ठेवण्यात आली आहे.जे ऊस उत्पादक एकरी १००००/- रु भरून सभासद होतील केवळ त्यांचाच ६० मे टन ऊस गाळपासाठी नवीन कारखान्यात जाणार आहे आणि त्या सभासदास पहिल्या वर्षी प्रती टन २००/- रु भाववाढ मिळणार आहे आणि तिथून पुढे प्रती वर्षी १००/- प्रमाणे भाववाढ मिळेल.शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे आपण १००००/- रु भरून सभासद झाल्यानंतर आपला एकरी ६० टन ऊस गाळपासाठी जाऊन भाव वाढी मुळे आपणास पहिल्याच वर्षी १२०००/- रु नफा मिळणार आहे त्या मुळे आपण सभासद होण्यासाठी भरलेल्या रकमेसह दोन हजन अधिक मिळतील आणि आपण कायम स्वरुपी कारखान्याचे सभासद राहाल पहिल्या वर्षी साखर उत्पादन आणि वीज निर्मिती सुरू होणार आहे त्या मुळे पहिल्या वर्षी दोनशे रुपये भाव वाढ आहे आणि त्या नंतर प्रत्येक वर्षी बाय प्रॉडक्ट चे नवीन युनिट तयार होतील आणि कारखाण्यावरील कर्जाचे ओझे हळू हळू कमी होणार असल्याने प्रती वर्षी शंभर रुपये भाव वाढ मिळेल त्यामूळे रेगुलर दरापेक्षा पाचशे रुपये भाव वाढ होणार आहे. ज्या लोकांकडे अधिकचा पैसा आहे अश्या व्यक्तींनी कारखान्याकडे गुंतवणूक (फिक्स डीपाॅजीट) केल्यास त्यांना द.सा.द.शे १५% व्याज मिळणार आहे.

   आपल्या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून शेतकऱ्यांमध्ये आर्थिक क्रांती घडवण्याच्या दृष्टिकोनातून या युनिटची उभारणी करण्याचा मानस उद्योग समूहाचा आहे तरी कार्यक्षेत्रातील उमरी, धर्माबाद, नायगांव, भोकर आणि बिलोली या तालुक्यातील शेतकऱ्यांना सभासद होण्याची संधी प्रथम असणार आहे आणि एकूण केवळ चाळीस हजार सभासद करून घेण्याचे नियोजन आहे त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी विलंब करू नये कारण चाळीस हजार सभासद नोंदणी पूर्ण झाल्या नंतर आपण प्रयत्न करून सुद्धा आपणास सभासद करून घेता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

      कार्यक्षेत्रातील सभासद नोंदीचा कालावधी पूर्ण झाल्या नंतर कर्यक्षेत्राबहेरील शेतकऱ्यास सभासद नोंदीची अनुमती दिली जाणार आहे त्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्याने आपली सभासद होण्याची रक्कम आपल्या जवळच्या व्हि पी के पथसंस्थेच्या शाखेत भरणा करून आपली सभासद नोंदणी करावी किंवा ज्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी येणार आहे अश्या व्यक्तींनी आपली सभासद नोंदणीची रक्कम ऊस बिलातून कपातीची संमती आपल्या गटातील कृषी सहाय्यक यांच्याकडे द्यावी आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक भवितव्य घडविणाऱ्या या ऐतिहासिक कामात आपला अमूल्य सहभाग नोदवावा असे अहवान उद्योग समूहाचे चेअरमन मा.श्री मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी केले आहे.

(टिपः- आपल्याकडे असलेल्या ऊस क्षेत्राप्रमाने आपण कितीही सभासद नोंद करू शकता त्यासाठी कमाल मर्यादा ठेवलेली नाही)

सावंत एस जे ऊस विकास अधिकारी

---------------------------------------

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा https://join.lokneta.in/

0/Post a Comment/Comments