गेवराईच्या स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघास राज्यस्तरीय उत्कृष्ट संघ पुरस्कार

This get from this site or source
लोकनेता न्यूज नेटवर्क

गेवराई (प्रतिनिधी) - समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. असे एकही घर नाही की जेथे जेष्ठ नागरिक राहत नाही . अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अडी -अडचणी, समस्या, त्यांना विरंगुळा आणि त्यांच्या सुख -दुःखात सामील होणारी संघटना म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ आहे . या उद्देशाने गेवराई मध्ये स्थापन झालेल्या स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संघास राज्य संघटनेकडून शानदार कार्यक्रमात  राज्यस्तरीय उत्कृष्ट संघ पुरस्कार देऊन  नुकतेच गौरविण्यात आले .                   ज्येष्ठ नागरिक संघ लातूर द्वारा आयोजित महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ (फेस्कॉम )  चे ३४  वे राज्यस्तरीय अधिवेशन ११  व १२ जानेवारी २०२५ रोजी लातूर येथील दिवाणजी मंगल कार्यालयात संपन्न झाले . या कार्यक्रमात दि. १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील आणि महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गेवराई येथील स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघास उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून शाल ,श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन  राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांची प्रमुख  उपस्थिती होती .  मंत्री महोदयांच्या हस्ते पुरस्कार  स्वीकारण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे, समन्वय समितीचे सदस्य एस.पी. सूर्यवंशी, स्वामी विवेकानंद जेष्ठ  नागरिक संघाचे अध्यक्ष ईश्वर आबदरे व इतर  पदाधिकारी सखाराम कानगुडे, रामकृष्ण चेडे ,अरुण परदेशी, लक्ष्मण रुकर, शोभाताई देशमुख, पुष्पाताई कोकाटे, यमुनाताई म्हेत्रे  यांनी उत्कृष्ट संघाचा पुरस्कार स्वीकारला . स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संघाने जेष्ठांची आरोग्य तपासणी, त्यांना मानसिक शारीरिक आर्थिक  मदत, वृक्षारोपण, विरंगुळा केंद्र निर्मिती, अडी - अडचणी सोडवणूक, जेष्ठांना कायदेविषयक मार्गदर्शन , वर्षा सहली, निसर्ग भ्रमण , वाचनालय, भजन - कीर्तन अशा विविध सुविधा, शासनाच्या सवलती  उपलब्ध करून दिल्या आहेत . याशिवाय तालुक्यात अल्पावधित १२ संघ व ३०० सदस्य नोंदणी केली आहे .   ज्येष्ठ नागरिक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष अरुण रोडे, खा. डॉ. शिवाजीराव काळगे, चंद्रकांत महामुनी, प्रकाश घादगिने, डॉ. बी. आर. पाटील, दक्षिण मराठवाडा प्रांताचे विभागीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. दामोदर थोरात, सचिव जगदीश जाजू , बीड जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ मामडगे  यांनी विशेष परिश्रम घेतले. अतिशय शिस्तबद्ध आणि भरगच्च अशा कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला . या कार्यक्रमास महाराष्ट्रातील ३५  जिल्ह्यातील ५००० ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुष उपस्थित होते . स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संघास पुरस्कार मिळाल्या बद्दल श्रीराम आरगडे, ॲड सुभाष निकम, प्रा. रामलिंग गुळवे, इंजि प्रकाश गिरी, एस. वाय. अन्सारी, बळीराम यादव ,वैजिनाथ मोरे, भीमजी पटेल, प्रभाकर घोडके, सुरेश मानधने ,डॉ अशोक येवले डॉ. भगवान जाधव, प्रमोद कुलकर्णी, बाबुराव नागरगोजे, प्रकाश भुते, विष्णु खेत्रे,प्रा . संदिपान हिंगे, सुभाष रणखांब , भास्कर ननवरे, दीपक पुरी, सतीश पल्लेवाड, नवनाथ बोडखे, नितीन कुलथे ,केशव पंडित, दत्तात्रय साळुंके, कल्याण हाकाळे, जयप्रकाश बाहेती ,विलास मडकर, राजेंद्र निकम, अमोल कापसे ,ॲड राहूल रूचके आदींसह जेष्ठ नागरिकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी  प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले .
_________________________

0/Post a Comment/Comments