पालकांनो मुलांना नीट नीटच करू द्या...

तुमच्या स्वप्नांचे ओझे झेलायला ते पाळलेले गाढव नाहीत...

टिका नव्हे टिपणी (जनहितास्तव) भाग ३

This get from this site or source
लोकनेता न्युज नेटवर्क

      सर्व प्रथम आज नीट ची परीक्षा देत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शूभेच्छा. या परीक्षेत आपण सर्वांनी यश संपादन करून यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी यशस्वी पर्यंत करायचे आहे.  
      जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीना काही उद्योग सुरू ठेवत असतो. मग काही जन जमेल तो व्यवसाय करतात, काही जण कुठे तरी नौकरी करतात. जमेल त्यापरीने सर्व जण आपल्या जीवनाचे चक्र सुरू ठेवत असतो. जन्माला आलेल्या प्रत्येकाला या चक्रयुद्धास सामोरे जावे लागणारच आहे.
        पुढे काय? हा सर्वत्र आणि सर्वांना विचारल्या जाणारा प्रश्न. दहावी शिकलात पुढे काय.बारावी शिकलात पुढे काय हाच प्रश्न अनेकांना विचारला जातो. पण पुढे काहीच नाही का? की शिकून केवळ गुलाम होणे हाच आपल्या जीवनाचा प्रवास आहे का ? असे असेल तर मग पुढे काय पुढे काय म्हणत आयुष्य संपून जाईल आणि आपल्याला जे साध्य करायचं ते राहून जाईल. आज अनेक पालक आहेत जे की त्याचं स्वप्न इंजिनियर डॉक्टर बनण्याच होत पण बनू शकले नाही किंबहुना त्यांच्या कडून ते साध्य झालं नाही. मग तेच स्वप्न तुम्ही तुमच्या मुलांवर लाधनार का हे कितपत योग्य आपण सांगा. गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघत आलोय अनुभवी लोकांना प्राधान्य देण्यात येत. मग केवळ शिकत राहील तर होईल का. तुम्ही मुलांना नीट, जे ई ई ला घालू नका या मताचा मी नाहीच हे किंवा कोणीही नसेल, परंतु आपल्या मुलांना कशात आवड आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. जिथे आवड असेल तिथे जाऊ द्या त्यांना त्यांच्या स्वप्नात रमु द्या. तुमच्या स्वप्नांचे ओझे त्यांना वाहायला लाऊ नका. 
       कोटा मध्ये सॉरी पप्पा म्हणत परत एकदा एका मुलाने आयुष्य संपवले. केवळ एका राज्यात नव्हे तर देशात कोटा नीट साठी सुप्रसिद्ध आहे. अस असल तरी 2023 मध्ये येथे 26 जणांनी आयुष्य संपवले. आपल्या जवळच असलेली छत्रपती संभाजी नगर येथे सुद्धा काही विद्यार्थ्यांनी संतापून आपले आयुष्य अर्ध्यातच सोडून दिले. का? तर फक्त अभ्यास होत नाही दोन तीन वेळा रिपीट करून सुद्धा झाल नाही. यावेळेस सुद्धा होणार नाही या भीतीने आपलं आयुष्य त्यांनी संपवलं. 
           सर्वांना आपले एक आयुष्य जगण्याचे आयुष्य आहे. त्यामुळे मुलांना त्यांच्या मनाने त्यांचं आयुष्य जगू द्या त्यांना ज्या गोष्टीं करायच्या करू द्या. कुणाला छायाचित्रकार होयच, कुणाला कुठे आपलं शॉप टाकायचं , कुणाला एखादा उद्योग सुरू करायचा हे ही आयुष्यातील यशस्वी होण्याचे मार्ग आहेत. केवळ नीटच हा एक मार्ग नाही.
        हल्ली ते क्लासेस वाले शहराच्या गल्लो गलित त्यांची दुकाने मांडून बसलीत पण शंभर टक्के निकाल दाखवणाऱ्या कोणत्याही संचालकाने मुलांना विचारलं नसेल की इथे स्व इच्छेने किती जण आलात किती जण स्वतः साठी नीट देताय. की घरच्यांनी पाठवल म्हणून सुरू आहे. अस म्हणारे कोणीही बघायला मिळणार नाही या उलट एखादा विद्यार्थी उद्योगात उतरण्याचे स्वप्न ठेवत असेल तर पालकांना फितवून नीट करायला लावा असेल संचालक बघायला बोलतील. पण पालकांनी ही बाब लक्षात घेऊन आपल्या मुलांना नक्कीच स्वतःच्या इच्छेने जगू द्यायला हवं त्यांचं करिअर करू द्यायला हवं तुमच्या स्वप्नांचे ओझे वाहायला ते काय गाढव नाहीत.a तुम्ही सांगत आहात आणि त्यांचे नीट हेच जग आहे हा त्यांच्या मनावर विकृत संदेश रुजता कामा नाही. 
       मित्रांनो हल्ली तुम्हाला पालकांनी कितीही अभ्यास करण्यासाठी प्रवृक्त केलं असेल. त्यात तुम्ही तुमचे संपूर्ण ताकतीने बुद्धीने प्रयत्न केले असेल तरी मार्क आले नाहीत तर. शक्य असल्यास रिपीट करा. नसेल शक्य तर शांत डोक्यांनी विचार करा आपल्याला काय जमेल ये आणि मग पूर्ण शक्ती एकवटून तयारीला लागा. आणि विजयाचा जल्लोष करूनच दाखवा. भलेही नीट देऊन डॉक्टर नाही झालात तरी चालेल पण आयुष्य हे खूप कोणती आहे . आणि ते आपल्याला आनंदने जगायचे आहे..
     पुनश्च सर्वांना नीट पेपर साठी खूप साऱ्या शुभेच्छा..!!


•ज्ञानेश्वर बुधवत
  मुख्यसंपादक दैनिक लोकनेता
  मातृतीर्थ सिंदखेड राजा
  9960209149
__________________________________

1/Post a Comment/Comments

Post a Comment