सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये काका आणि पुतण्याची लढाई ही सर्वश्रुत असताना मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील मतदारसंघांमध्ये एकमेव काका आणि पुतणीची जोरदार लढत होणार असून यामध्ये पुतणी काकाला जेरीस आणत आहे. आज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी प्रचाराचा नारळ फोडत काकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. आमदार शिंगणे यांनी 25 वर्षांमध्ये मतदारसंघात कोणतेच काम न करता मतदार संघाला भकास करून सोडले आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य करून सूतगिरणी,जिल्हा बँक, कारखाना बंद पडला असून हजारो कामगार त्याचे बळी ठरले आहेत. कामगारांचा कुठल्याही प्रकारे डॉक्टर शिंगणे यांनी विचार केला नाही असे व्यक्ताव्य गायत्री शिंगणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला.
जिल्हा बँक काका राजेंद्र शिंगणे यांनीच बुडवली - गायत्री शिंगणे यांचा घणाघात
लोकनेता न्युज नेटवर्क
आमदार शिंगणे यांनी अजितदादा कडे मदत माघितल्या नंतर बंडखोरी करून दादा सोबत जाऊन मदत घेतल्या नंतर त्यांनी अजित दादांना सोडायला नको होते. असे मला वाटते. त्या नंतर शरद पवार साहेबांनी मतदार संघामध्ये काम सुरू करायचे सांगितल्या नंतर मागिल 9 महिन्यासाठी पासून आम्ही काम करत असताना ऐन वेळेवर पवार साहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही. आणि डॉ. राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी जाहीर केली. असे असतांनाही मी स्वबळावर लढणार असून मागील 25 वर्षात जो विकास मतदार संघाचा झाला नाही. तो मी करून दाखवेल.
अनेक धमक्या आल्या तरी मी माझ्या निर्णयावर ठाम
लोकनेता न्युज नेटवर्क
गेल्या 25 वर्षापासून पाहिजे तसा विकास झालेला नसून. लोकांना प्रतिसाद दिलेला असून लोकांचा मला प्रतिसाद आहे. परंतु विरोधकांनी अफवा प्रसरवण्याचे काम केलं आणि आता सुद्धा मी पेटी बंद ठेवणार आहे अशी अफवा पसरवल्या जात आहे आहे. परंतु अशा कोणत्याही अफवांवर भरवोसा ठेवू नका. मी शेवट पर्यंत लढणार आहे. जिंकेल किंवा हरेल हा नशिबाचा खेळ आहे. बाकीच्या उमेदवारांनी केवळ जातीवादाचे राजकारण केले आहे. असे राजकारण आपल्याला करायचे नाही. माझे आजोबा भास्करराव शिंगणे यांनी मतदार संघात पूर्ण आयुष्य घातलं असून आणि अनेक प्रकल्प त्यावेळी आणले होते. दुर्दैवाने ते बंद पडलेत परंतु मी निवडून आल्या नंतर माझा पहिला प्रयत्न त्या प्रकल्प सुरू करणार आहे. ही लढाई माझी आणि जनतेची आहे. मी विकास या मुद्यावर ठाम आहे आणि विकास घेऊनच मी पुढे जाणारा आहे. असे गायत्री शिंगणे यांनी सांगितले.
_______________________________
Post a Comment