सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- विधानसभा २०२४ च्या अर्ज दाखल करण्यासाठी आज सिंदखेड राजा मतदार संघामध्ये गायत्री शिंगणे यांनी त्यांच्या हजारो समर्थकांसोबत अपक्ष अर्ज दाखल केला असून.
गायत्री शिंगणे या मागील दोन तीन वर्षा पासून मतदार संघात नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवत असून त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेतृत्व करत होत्या, परंतु आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मागील आठवड्यात अजितदादा पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर होणार नाही म्हणून त्या अजित पवार गटात गेल्या. तरी देखील त्यांना उमेदवारी मिळण्याची संकेत नसल्यामुळे मुळे आज त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अर्ज दाखल करतेवेळी गायत्री शिंगणे यांच्या हजारो समर्थकांनी गर्दी केल्याचं दिसून आले. गेल्या अनेक वर्षा पासून मतदार संघात विकास कामे न झाल्याने, मतदार संघातील तरुणांवर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी मी पुढील काम करणार असून, अनेक वर्षा पासून बंद असलेल्या जिजामाता सहकार साखर कारखण्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. मतदार संघात एम आय डी सी आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
__________________________________
Post a Comment