सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघा मध्ये नाट्यमय घडामोडी घडत असून. त्यामुळेच मतदारसंघाने एक वेगळे रूप धारण केले आहे. काल दि.२८ रोजी सायंकाळी ९ च्या सुमारास डॉ.शशिकांत खेडेकर यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांनी आज ११:३० वाजता आपला उमेदवार अर्ज दाखल सुद्धा केला आहे.
असे असतांनाच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मनोज कायंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस अजिदादां पवार गट जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांच्या उपस्थितीत तालुका संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला आहे. आणि यावेळी त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे.
भाजपा च्या उमेदवारी कडे सर्वांचे लक्ष लागून
गेल्या ८ दिवसापासून सिंदखेड राजा मतदार संघात नाट्यमय घडामोडी घडत आहे. अशातच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती मध्ये बिघाडी झालेली दिसून आली आहे. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आज शिवसेना गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर मनोज कायंदे हे देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अस असेल तर भारतीय जनता पार्टी आपला उमेदवार कोण देईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
__________________________________
Post a Comment