चिखली :- सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या अंबाजोगाई, जि. बीड येथील महिला वकील ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान यांनी कर्कश आवाजाच्या डिजे विरोधात केलेल्या तक्रारीमुळे त्वेषाने दहा समाजकंटकांनी त्यांना केलेल्या भयानक जीवघेण्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी चिखली तालुका वकील संघातर्फे आज कामकाज निषेध करण्यात आला. तसेच मा. राष्ट्रपती महोदयांना, सदर गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक व कठोर शिक्षा करण्याची व सोबतच देशभरातील वकीलांना संरक्षण व त्यांचे हक्कसंवर्धन करणारा अधिनियम/ कायदा त्वरित पारीत करण्यासंदर्भात मा. तहसीलदार, चिखली यांच्या मार्फत वकील संघातर्फे नम्र निवेदन उपाध्यक्ष ॲड. किरणकुमार हनवते तसेच ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार कस्तुरे तथा इतर मान्यवर वकील मंडळींच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी ॲड. हनवते यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले. निवेदन स्विकारताना उपस्थित मा. ना. तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी, सदर निवेदन तातडीने संबंधितांपर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी पुढील मान्यवर संजय सदार, रेखा हणमंते, राहुल धुरंधर, डी. व्ही. जाधव, आर. व्ही. डोंगरदिवे, सुनील अवसरमोल, ए. एस्. जाधव, भूषण तुपसौंदर, डी. एस्. वानखेडे, वैशाली भंडारे, रूपाली चौधरी, संजय देशमुख
इ. वकील तथा बरीच नागरिक मंडळी उपस्थित होती.
Post a Comment