जालना :- शहरातील भोकरदन नाका येथील प्रियदर्शनी कॉलनी येथे राहत असलेल्या एका सुनेने दि.०२ एप्रिलच्या पहाटे सासूची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रेम विवाह करून घरात आलेल्या सुनेने सासूची हत्या करून मृतदेह गोनीत भरल्याचे समोर आले आहे. मात्र मृतदेह भरलेली गोणी उचलता आली नाही म्हणून सून घरून पसार झालेली आहे. घडलेला प्रकार घर मालकाच्या लक्षात येताच घरमालकाने पोलिसांना माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस खात्याने दिलेल्या माहिती नुसार सविता शिनगारे असे मृत महिलेचे नाव असून आरोपी सुन प्रतीक्षा शिनगारे हिने सासूचे डोके भिंतीला आदळून हत्या करण्यात आली असून त्यानंतर मृतदेह गोनीत भरण्यात आला आहे. मात्र मृतदेह भरलेली गोणी उचलता न आल्याने प्रतीक्षा शिनगारे घटनास्थळावून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
सहा महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील प्रतिक्षा सोबत आकाश यांचा प्रेम विवाह झाला होता, प्रेम विवाह झाल्या नंतर आकाश आपल्या परिवारा सोबत जालना येथील भोकरदन नाक्या जवळ असलेल्या प्रियदर्शनी कॉलनीत राहत होता, नोकरी निमित्त आकाश शिनगारे नांदेड येथे गेला असता सुनेने संधीचा फायदा घेत सासूची हत्या केली आहे. हत्ये मागील कारण अजून स्पष्ट झाले नसून यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का याची माहिती तपासात पुढे येईल. व लवकरच आरोपीला शोभून काढण्यासाठी दोन पोलिस पथके तयार केली असल्याची माहिती आयुष नेपानी अप्पर पोलिस उपअधीक्षक जालना यांनी दिली आहे. या घटनेने जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
________________________
Post a Comment