लोकनेता न्यूज नेटवर्क
नांदेड (बाजीराव पाटील) :- ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी केवळ राजकीय सत्तेची गरज नसते, तर प्रबळ इच्छाशक्ती आणि समाजाप्रती अढळ निष्ठा असावी लागते. हे आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी. "माझा शेतकरी प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे," हे केवळ ब्रीदवाक्य न ठेवता, त्यासाठी अहोरात्र कष्ट उपसणारा हा 'द्रष्टा' शिक्षक आज संपूर्ण परिसरासाठी विकासाचा कणा ठरला आहे.
शेतकरी केंद्रबिंदू :- केवळ कारखाना नाही, तर समृद्धीचे दालन
कवळे गुरुजींचा ऊस उत्पादक शेतकऱ्यां प्रती असलेला जिव्हाळा शब्दांच्या पलीकडचा आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उभे केलेले कारखाने हे केवळ साखर उत्पादनाचे केंद्र नसून, ते शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत. शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळावा आणि त्याच्या घरात सुबत्ता यावी, यासाठी गुरुजींचे प्रयत्न आजही अखंड सुरू आहेत.
जलसंधारण आणि पर्यावरण रक्षण
केवळ कारखानदारीवर न थांबता, गुरुजींनी शेतीच्या मूलभूत गरजांकडे लक्ष दिले. पाण्याचे महत्त्व ओळखून त्यांनी स्वखर्चातून अनेक कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधले. यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढून शेतकऱ्यास शाश्वत सिंचनाची सोय होईल हा यामागचा उद्देश होता. निसर्गाप्रती असलेल्या कृतज्ञतेपोटी त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा आदर्श घालून दिला आहे.
सहकारातून आर्थिक क्रांती:- वीस शाखांचा विस्तार
शेतकऱ्याला सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी त्यांनी पतसंस्थेचे जाळे विणले. आज त्यांच्या पतसंस्थेच्या २० शाखांमार्फत गरजू शेतकऱ्यांना अत्यंत सुलभरीत्या कर्जपुरवठा केला जातो.
युवकांसाठी संधी:-
उद्योग समूहाच्या माध्यमातून कुशल व अकुशल असलेल्या हजारो तरुणांना रोजगार दिला.
बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसायासाठी पथसंस्थेच्या माध्यमातून अर्थसहाय्य दिले जाते.
महिला सक्षमीकरण:- महिला बचत गटांची स्थापना करून, त्यांना गृहउद्योगासाठी केवळ कर्जच नाही तर योग्य मार्गदर्शनही दिले जाते. यामुळे ग्रामीण भागातील महिला आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत.
स्वतः शिक्षक असल्याने गुरुजींना शिक्षणाचे महत्त्व ठाऊक आहे. ग्रामीण भागातील मुलांनी उच्च शिक्षण घेऊन जगाच्या स्पर्धेत टिकावे, यासाठी त्यांनी शैक्षणिक संस्थांची उभारणी केली आहे. या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडत असून, 'ज्ञान' आणि 'विज्ञान' यांची सांगड घातली जात आहे.
सामाजिक कार्याचा वसा
राजकीय अभिनिवेश बाजूला सारून सामाजिक कार्यात अग्रेसर राहणे, हा गुरुजींचा स्वभाव आहे. संकटकाळात धावून जाणे असो वा सार्वजनिक उत्सवांना विधायक वळण देणे, कवळे गुरुजी नेहमीच अग्रभागी असतात. त्यांच्या या कार्यामुळेच लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे.
मारोतराव पाटील कवळे गुरुजी म्हणजे शिक्षकी पेशातील शिस्त, सहकारातील पारदर्शकता आणि समाजसेवेतील कळकळ यांचा त्रिवेणी संगम आहे. शून्यातून विश्व निर्माण करून त्यांनी जो विकासाचा रथ ओढला आहे, तो येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. एका शिक्षकाने ठरवले तर तो केवळ साक्षरता नाही, तर संपूर्ण समाजाची आर्थिक आणि सामाजिक क्रांती घडवू शकतो, हे गुरुजींनी जगाला दाखवून दिले आहे.
"शेतकरी सुखी तर जग सुखी, या मंत्राचा ध्यास घेणाऱ्या मारोतराव पाटील कवळे गुरुजींच्या झंझावाती कार्याला माझा सलाम!"
सावंत साईनाथ
ऊस विकास अधिकारी
व्हि.पी.के उद्योग समूह
संचालक गुरुजी फाऊंडेशन
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/
.jpg)
Post a Comment