लोकनेता न्युज नेटवर्क
चिखली : आपल्या साहित्यिक उपक्रम तथा विविधांगी साहित्य यात्रींना प्रतिभाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यात सदैव अग्रेसर असलेल्या बहुजन साहित्य संघ, चिखली ( जि. बुलढाणा ) च्या वतीने या वर्षी संतनगरी पंढरीच्या पद्मनाभ पॅलेस हॉल येथे दि. २३-०८-२०२६, रविवार रोजी आयोजित सातव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलन निमित्ताने उपस्थित व निमंत्रित मान्यवरांच्या सन्मानाप्रित्यर्थ सप्रेम भेट म्हणून चिखली वकील संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक व विधिज्ञ क्षेत्रातील ज्येष्ठ वकील सतीश मोतीरामजी गवई यांच्या कडून संमेलन संदर्भ व स्थळ निर्देशित सुंदर अशा दोनशे बॅग्ज ची देणगी प्रदान करण्यात आली. संघाचे सचिव डॉ. डी. व्ही. खरात, उपाध्यक्ष डॉ. बबनराव महामुने, पदाधिकारी भावकवी अंकुश पडघान तसेच अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे यांनी सदर देणगीचा आदरपूर्वक स्विकार केला. यावेळी ॲड. सतीश गवई यांच्या निवासस्थानी त्यांच्यासह त्यांची पत्नी तथा सामाजिक व स्टेट बॅंक क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व असलेले त्यांचे वडील मोतीरामजी गवई व चिरंजीव हे ही उपस्थित होते.
या प्रसंगी ॲड. गवई यांना त्यांच्या चिखली येथील सम्राट अशोक -फुले-शाहू-आंबेडकर-वाटिका-जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षीय कार्यकालातील तसेच आजवरच्या त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक बांधिलकीची परंपरा जपण्यानिमित्ताच्या यशवंत वाटचालीसाठी सन्मानाचा
" फुले - शाहू - आंबेडकर "
हा यावर्षी चा पुरस्कार ब. सा. सं. च्या वतीने जाहीर करण्यात येवून तसे पत्र त्यांना सन्मानाने प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना पंढरपूर येथे प्रस्तावित संमेलनातील मान्यवरांच्या हस्ते मानसन्मानात प्रदान करण्यात येणार असून त्यासाठी त्यांनी संमेलनात सहकुटुंब उपस्थित राहण्याची विनंती संघाच्या वतीने करण्यात आली.
तसेच या संमेलनात राज्यभरातील सर्व मान्यवर साहित्यिक, लेखक, कवी, कथाकार व कलावंत यांना त्यांच्या साहित्याविष्काराची संधी उपलब्ध असून विविध क्षेत्रातील समर्पित सेवेसाठी मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार असून त्यांनी संमेलनात उपस्थित राहण्यासाठी नम्र आवाहन करण्यात येत असल्याचे तसेच त्यास्तव
रवि पुष्पा वसंत सोनार,पंढरपूर
९९२२५१४३००
तसेच
डॉ. डी. व्ही. खरात, बुलढाणा
७७४४८११९८२
यांच्या बरोबर संपर्क साधावा असे आवाहन नम्रपणे केले आहे.
________________________
Post a Comment