लोकनेता न्युज नेटवर्क
पंढरपूर :- दि. ११ रोजी स्थानिक नागालॅंड चौक, पंढरपूर स्थित श्री. गणेश मंदिर परिसरात ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी मा. नागेश सिंघन, बहुजन साहित्य संघ, चिखली चे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे, उपाध्यक्ष डॉ. बबनराव महामुने, यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्मिक संवाद प्रकाशन संस्था, पंढरपूर चे संस्थापक अध्यक्ष रवि पुष्पा वसंत सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये,
संघाच्या वतीने पंढरपूर येथे दि.२३ - ०८ - २०२६ रोजी पद्मनाभ पॅलेस हॉल च्या सुंदर व भव्य परीसरात प्रायोजित सातवे राज्यस्तरीय बहुजन साहित्य संमेलन, २०२६ - संदर्भात संमेलनाच्या सर्वांगीण व यशस्वी संपन्नतेसाठी पारंपारिक व साहित्यिक ग्रंथ दिंडी, विविध प्रदर्शनी, उदघाटन, परिसंवाद विषय, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम, काव्याविष्कार, विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण, ठराव वाचन, समारोप, भोजन, फोटो चित्रिकरण इ. बाबतीत विविधांगी विषयांवर विचार विनिमय होऊन विविध सत्रामधील सहभागी मान्यवरांची नांवे तसेच आविष्करणीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच संमेलन स्थळ हॉल सदर दिवशी विनाशुल्क उपलब्ध करून देण्याबाबत चे पत्र मालक व संचालक मा. गणेश सिंघन यांच्या वतीने आयोजकांना सन्मानाने सुपूर्द करण्यात आले.
या बैठकीत लघुपट दिग्दर्शक संतोष शिरगिरे, चलचित्रकार सचिन कुलकर्णी इ. उपस्थित होते.
या बहुजनांच्या बहुआयामी प्रदर्शन बाहुल्य संमेलनाच्या प्रबोधन यात्रेत आपल्या प्रतिभाविष्काराचा ऐतिहासिक व अभिनव सोहळा सर्वार्थ संपन्न करण्यासाठी सर्व साहित्यिक, लेखक, कवी, कथाकार तथा हरहुन्नरी कलावंत यांनी संयोजक रवि पुष्पा वसंत सोनार, पंढरपूर ९९२२५१४३०० या क्र. वर तथा डॉ. डी. व्ही. खरात, बुलढाणा ७७४४८११९८२ या क्र. वर त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नम्रपणे आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
________________________
Post a Comment