निलंगा | इस्माईल महेबूब शेख :- शेतकरी अपमानित होईल असे वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केल्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत याच्याच निषेधार्थ निलंगा तालुक्यातील मसलगा येथे छावा संघटनेच्या वतीने कृषी मंत्राचा पुतळा जाळून जोडो मारो आंदोलन करण्यात आले. व कृषिमंत्र्याच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनात तालुका अध्यक्ष छावा तुळशीदास साळुंके, माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड, बालाजी पिंड, मारुती जाधव, योगेश मोहनराव पाटील, प्रभाकर तेलंगे, शिवाजी जाधव, राजकुमार बनसोडे, विठ्ठल पवार, संभाजी जाधव, हाजू साहेब शेख खूप मोठ्या संख्येने शेतकरी व छावा पदाधिकारी उपस्थित होते.
________________________

Post a Comment