देगलूर | धनाजी जोशी :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन सोहळ्याप्रसंगी आमदार महोदयांनी आपल्या फेसबुकवर टाकलेल्या पोस्टर वर तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांची नावे नसल्यांने देगलूरात चर्चेला उधाण,देगलुरच्या भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर व शहराध्यक्ष प्रशांत दासरवार यांची नेमणूक २०२३ साली तत्कालीन भाजपा विधानसभा मतदारसंघ प्रमुख मा आमदार सुभाषराव साबणे साहेब व मा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाली होती,भाजपात दर तीन वर्षांनी पदाधिकारी यांची अनेक पदांवर निवड करण्यात येते, परंतु देगलुरचे भाजपा तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर व शहराध्यक्ष प्रशांत दासरवार यांच्या कालावधी तिनं वर्षांचा असताना त्यांना पदावर दोनच वर्ष संधी का? त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात लोकसभेची निवडणूक लागली त्यात त्यांनी तिनं महिने पक्षाची धुरा सांभाळल्यात व्यस्त त्यांनंतर एका वर्षांनी लगेच विधानसभा निवडणुकी लागली त्या निवडणुकीत त्यांनी पायाला घुंगरु बांधून पक्षाचे आमदार जितेश अंतापुरकर साहेब यांचे काम करुन आमदार जितेश अंतापुरकर महोदयांना भरघोस मतांनी निवडून आणले आणि विधानसभेत धाडले,तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष यांचा कालावधी अजुन एक वर्षाचा असल्यानं त्यांना एवढा लवकर काढण्याची घाई कश्याकरती आमदार जितेश अंतापुरकर साहेब यांना तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर व शहराध्यक्ष प्रशांत दासरवार हे पदावर नको हवेत का? यांचा वापर फक्त विधानसभे पुरता करून त्यांना मोकळे करायचे का असे अनेक प्रश्न देगलुरच्या जनतेला पडला आहे, आमदार जितेश अंतापुरकर साहेब हे प्रत्येक कार्यक्रमात प्रोटोकॉल नुसार तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना सोबत घेऊन जाणे अनिवार्य असताना अनेक कार्यकर्त्यांमध्ये अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर व शहराध्यक्ष प्रशांत दासरवार यांना डावळत असल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळाले.
________________________
Post a Comment