शाहू राजा.....

This get from this site or source
लोकनेता न्युज नेटवर्क

शाहू राजा.....
शाहू राजा.....
शाहू राजा.....मायबापा
वंचितांची वंदना 
पायी तुझ्या रे sssss धृ.

कालचे आम्ही जे 
नाकारलेले.....
गुलामीच्या शृंखलांनी 
बध्द ठेवलेले.....
डोळे असोनी 
अंधारलेले.....
वाचा असोनी 
जीभ कापलेले.....
नजरेस आले sssss
केवळ तुझ्या 
    शाहू राजा sssss - १.

युगांचे उपाशी 
पाहीलेस जेव्हा..... 
हुंदके तयांचे 
ऐकलेस तेव्हा.....
हाल शोषितांचे
जाणलेस जेव्हा.....
आरक्षित हक्क तयांचे 
केलेस तेव्हा.....
असा लोकराजा sssss
नाही दुजा
   शाहू राजा sssss - २

महाराचा पोर एक 
मॅट्रिक झाला.....
कळताच भेटीसाठी 
धावून गेला.....
बघताच बाळ भिमाला 
अचंबित झाला.....
दलीतांचा वाली आला 
बोलून गेला.....
वेध भविष्याचा sssss
नयनी तुझ्या 
    शाहू राजा sssss - ३

तुझ्या विचारांची 
पेटती मशालं.....
घेवूनिया पुढे निघाला 
रामजीचा लालं.....
मूलभूत हक्कांची 
करूनिया ढालं.....
संविधान देशाला 
केले बहालं.....
काव्य कस्तुरेचे sssss
पायी तुझ्या 
     शाहू राजा sssss - ४


-ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे, 
व्होकेट,चिखली
९५५२०९४०४९
________________________

0/Post a Comment/Comments