लोकनेता न्युज नेटवर्क
वाघाळा (स्वाती सोनकांबळे) :- नांदेड शहरातील महानगरपालिका हद्दीतील हडको-सिडको भागात सलग १५-२० दिवसांपासून पाण्याचा तुटवडा निर्माण केला आहे.पाणी आणण्यासाठी नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.तसेच पाणी टंचाईमुळे पाणी टॅन्कर विकत घ्यावे लागत आहे; पण ते सामान्य माणसाला परवडेल असे नाही.यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी महानगरपालिका प्रशासनाविरोधात २ मे रोजी महानगरपालिका कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला होता.या आंदोलनात भाजप कार्यकर्ते संजय पाटील घोगरे, संजय इंगेवाड, वैजनाथ देशमुख,सतीश पाटील बस्वदे,राजूभाऊ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली झोन क्रमांक ६ तसेच हडको-सिडको मधील विविध भागात पाणीटंचाई बाबतच्या प्रश्नांसाठी महानगरपालिका प्रशासनाविरोधात घागर मोर्चा चे आयोजन केले होते.घरपट्टी नळपट्टी भरून देखील हडको-सिडको भागात पाणीटंचाई होत आहे याच्या निषेधार्थ सर्व भाजपा कार्यकर्ते खुप आक्रमक झाले होते.पाण्याच्या टॅन्करची व्यवस्था महानगरपालिका का करत नाही असा प्रश्न भाजप कार्यकर्ते संजय पाटील घोगरे यांनी महानगरपालिका प्रशासनाला विचारला.सलग २० दिवसांपासून पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा सर्व भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला.तीन वर्षांपासून हातपंप बंद आहेत तरी ते अजून चालू करत नाहीत.कचऱ्याची समस्या देखील तशीच आहे, या सर्व मागण्यांसाठी लवकरच भव्य मोर्चा काढला जाईल, यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर पडावे असे आवाहन भाजप कार्यकर्ते संजय पाटील घोगरे यांनी केले आहे.
--------------------------------------
🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in/
Post a Comment