राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधी परिसरात सापडले तेराव्या शतकातील शिवमंदिर
मातृतीर्थ सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत)
छञपती शिवाजी महाराजांचे आजोळ असलेले माता जिजाऊंचे माहेर घर हे स्वराज्यातील मानाचे च शहर.. जगातील सर्वात मोठी हिंदू राजाची समाधी सिंदखेड राजा येथे राजे लखोजीराव जाधव यांची आहे. राजे लखोजिराव जाधव व त्यांच्या चार मुलांची हत्या मुस्लिम राजवटीमध्ये करण्यात आली होती त्यानंतर १० वर्षाच्या कालावधी मध्ये रामेश्वर मंदिरा शेजारी राजे लखोजिराव जाधव यांची समाधी बांधण्यात आली. या मध्ये लखोजीराव जाधव यांचे दत्ताजीराव, अचलोजिराव, रघोजीराव व यशवंतराव या चार मुलांच्या देखील समाधी मंदिरात समाधी आहे. इसवीसन १६३० ते १६४० या काळात या समाधी मंदिराचे बांधकाम झाल्याची माहिती समधीवरील तारखेवरून मिळते.
राजे लखुजी जाधव यांच्या समाधी परिसरात खोदकाम काम सुरू असताना तेराव्या शतकातील यादवकालीन पूर्वाभिमूख शिवमंदिर राजे लखुजी जाधव यांच्या समाधी समोर सापडले असुन या ठिकाणची पाहणी अरुण मलिक अधीक्षक पुरातत्व विभाग भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मंडळ नागपूर आणि त्यांच्या चमूने पाहणी केली आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग उत्खनन करताना १८ मे रोजी या ठिकाणी यादवकालीन शिवमंदिर उत्खनन करताना सापडले या मंदिरामध्ये महादेवाची मोठी पिंड,व्दारशिला व हे मंदिर मोठ्या दगडाने बांधलेले असून मंदिराखाली दगडी फरशी टाकलेली दिसुन येत आहे. उत्खननात सापडलेल्या मंदिराची स्थापना रामेश्वर मंदिरा सोबत झाली असू शकते, परंतु नंतरच्या काळात हे जमिनी खाली गाडल्यागेले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. खोदकामात आढळलेल्या मंदिराचा काही भाग माती खाली दबलेला असून. या ठिकाणी अजून उत्खनन केले जाणार आहे,उत्खनन पूर्ण झाल्यानंतरच या मंदिराची रहस्य लोकांसमोर येणार आहेत. भारतीय पुरातत्व विभागाच्या नागपूर येथील सर्वेक्षण अधिकारी सविस्तर या ठिकाणची पाहणी करून माहिती घेत आहेत व याबाबत सविस्तर तपासणी करून या विषयी माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
उत्खनन होणे गरजेचे
पुरातत्व विभाग जैसे ते काम करतांना दिसते आहे. आजतागात लाखोजिराव जाधव यांच्या राजवाड्यातील लाईट असो की मग सीसीटीव्ही कॅमेरे स्थानिकांनी आरडाओरड केल्या शिवाय कोणाच्याही लक्षात येत नसे. परंतु आता राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीचे शोभीकरण करत असतांना सापडलेल्या यादवकालीन पूर्वाभिमूख शिवलिंगाने स्थानिकांना व परिसरातील नागरिकांना शिवलिंग बघण्याची भुरळ पडली आणि या ऐतिहासिक नगरीचा पुनश्च इतिहास उलगडू लागला आहे. या ऐतिहासिक नगरिमध्ये अनेक गोष्टी बघायला मिळतात आणि उत्खनन करत असताना सापडलेले शिवलिंग हे स्पष्ट करते की तेराव्या शतकात या नगरीमध्ये बांधकाम झालेले असावे आणि त्याचे अवशेष इथेच माती खाली गाडल्या गेले असावे. असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. म्हणूनच येथे उत्खनन होणे गरजेचे आहे असा निष्कर्ष इतिहासकारांनी नोंदविला आहे.
__________________________________
Post a Comment