सामाजिक अभिसरण तथा संवैधानिक जागृती व राष्ट्रीय एकोपा संवर्धनासाठी देशाच्या विविध प्रांतातील साहित्यिकांनी संमेलनाच्या रूपाने वैचारिक चळवळ उभी करणे ही काळाची गरज आहे ! - ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे

लोकनेता न्युज नेटवर्क

हम्पी कर्नाटक :- साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संभाजीनगर च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2024 मध्ये कर्नाटक काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येवून हम्पी या दक्षिणात्य राजा कृष्णदेवरायांच्या साम्राज्य परिसरातील ऐतिहासिक स्थळी कोप्पल येथील हॉटेल शिल्पा ग्रँड च्या सभागृहात, संस्था अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगरचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक तथा स्कॉटलंड यार्डचे स्टुडन्ट्स ब्रॅंड ॲंबेसेडर डॉ. संघर्ष सावळे यांच्या अध्यक्षतेखाली व संबंध भारतभर लोकप्रिय असलेल्या सिने गायिका सुचिता भगवाधारी तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर तथा लोककवी वामनदादा कर्डक यांचे पटशिष्य प्रतापसिंग बोदडे उर्फ बब्बू कव्वाल यांची कन्या तथा महाराष्ट्राची उदयशाली गायिका रागिनी बोदडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, अंतर्राष्ट्रीय ख्याती प्राप्त कवी तथा सामाजिक क्षेत्रातील सातदशकांच्या अविरत सेवेसाठी साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्राप्त तसेच केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा बहुजन साहित्य संघ, चिखलीचे अध्यक्ष डॉक्टर विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांचे हस्ते उदघाटन होऊन सदर सोहळा संपन्न झाला. त्यावेळी आपल्या उदघाटकीय भाषणांमधून डॉक्टर कस्तुरे यांनी वरील उद्गार काढले. आपल्या अध्यक्षिय भाषणातून अध्यक्ष डॉक्टर सावळे यांनी संस्थेचे सामाजिक तथा साहित्यिक कार्य विषद करून पुढील प्रस्तावित संमेलन भारता शेजारील देशांत आयोजित करण्याबाबत घोषणा करून सर्वांना त्यात सहभागी होण्याचे निमंत्रणही दिले. सदर कार्यक्रमात उपरोक्त अतिथी सुचिता भगवाधारी तसेच रागिनी बोदडे, सामाजिक कार्यासाठी अमेरिकन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. डी.व्ही. खरात, चिखली, मा. झोडपे दांपत्य, मा.उज्वला शिरसाट, मा. उके, मा. हिवराळे इत्यादी मान्यवरांना संस्थेच्या वतीने त्यांच्या विविध क्षेत्रातील यशवंत वाटचालीस्तव संस्थेच्या वतीने मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान चिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच साहित्यिक कथा क्षेत्रातील ख्याती प्राप्त कथाकार कवी डॉ. बबनराव महामुने, छ. संभाजी नगर यांनाही कथा रत्न पुरस्कार जाहीर करून तो पुढील आंतरराष्ट्रीय संमेलनात प्रदान करण्यात येईल असे जाहीर करून त्यांचाही सत्कार करण्यात आला. संमेलनात अंकुश पडघान, आयु. प्राजक्ता दिग्रसकर, झोडपे, उके, हिवराळे तथा विविध ठिकाणच्या कवी शायरांसह डॉ.सावळे,डॉ.डी.व्ही.खरात, यांनी आपापल्या सुरेल काव्यरचनांनी तर डॉ.बबनराव महामुनेंनी आपल्या परकायाप्रवेशी कथाकथनाने आणि गायिका सुचिता भगवाधारी व रागिनी यांच्या मराठी, हिंदी सिने व सूफी गीत गायनासह प्राजक्ता दिग्रसकर यांच्या अभिनयकलेने सारे सभागृह भारावून टाकले. तर देशातील महाराष्ट्र,गोवा,गुजरात, कर्नाटक,आंध्र,चेन्नई,पांडेचेरी, दिल्ली इ. बरोबरच अंतर्राष्ट्रीय स्तरावर नेपाळ काव्य संमेलन गाजविलेल्या डॉ विजयकुमार कस्तुरे यांच्या - त्या तरूच्या सावलीला चल सखे बोलू जरा - या भारतीय कुटुंब संस्थेची महती सर्वांच्या काळजावर गोंदणाऱ्या गेय कविते सह भारतीय संविधानाचे व महार समाजातील पहिल्या मॅट्रिक पास झालेल्या बाळ भीमाला भेटावयास जावून त्या बाळाचे तेज पाहून, दलितांचा वाली आला ! असे घोषित करणाऱ्या व आपल्या राज्यात शुद्र व अस्पृश्य यांच्या साठी आरक्षणाच्या कायद्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छ. शाहू राजांचे महात्म्य सांगणाऱ्या काव्य गीत गायनाने सारा माहोल मंत्रमुग्ध करून टाकला. अशारितीने बुलढाणा सह विविध ठिकाणच्या कवी तथा कलाकारांनी आपल्या काव्य व कलाविष्कारांनी संमेलनास वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. सलग सात दिवस चाललेल्या या विविधरंगी संमेलन महोत्सवात विविध कार्यक्रमाबरोबरच ऐतिहासिक स्वरूपाचे बदामी, हम्पी तथा कृष्णदेवराय साम्राज्याच्या प्रचंड पाषाणातून जिवंतपणे साकारलेल्या राजमहाल, प्रासाद, मंदिरे, किल्ले, बुरुज, सरोवर, हत्तीमहाल इत्यादी बरोबरच बदामी पहाडांमधून कलात्मकरित्या कोरलेली शिल्पे तसेच हेमाडपंथी पध्दतीने उभारलेल्या तत्कालीन इमारती व शेकडो बाजारपेठा, नगराच्या अप्रतिम रचना इत्यादींचे ही दर्शन आयोजकांनी घडवून दिले व या सफरीतआदर्श नामक वाटाड्याने व त्याचा सहकारी श्री या तरुणांनी सुद्धा सर्वांच्या व्यवस्था व सोई कडे प्रामुख्याने लक्ष पूरवून संपूर्ण काव्य महोत्सव व साहित्यिक सहल यशस्वी केली. त्याच दरम्यान देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनाची वार्ता कळल्यानंतर त्यांना, परतीच्या वाटेवर सोलापूर नजीकच्या हॉटेल प्राची च्या परिसरात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

_______________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in/

0/Post a Comment/Comments