नांदेड | स्वाती सोनकांबळे :- दि.२९ रोजी मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येते आज इंदिरा गांधी हायस्कूल येथे विविध क्रीडा संघटना तर्फे व माजी विद्यार्थी व माजी खेळाडू तसेच शाळेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक डॉ. अण्णा गरड दैनिक प्रजावाणी चे प्रतिनिधी किरण देशमुख ज्येष्ठ क्रीडा शिक्षक विनोद जमदाडे ऑलिंपिक असोसिएशनचे जिल्हा सचिव डॉ राहुल वाघमारे कराटे असोसिएशन चे सचिव एकनाथ पाटील, टेनिस व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव कासिम खान,क्रीडा शिक्षक कैलास पवार राष्ट्रीय खेळाडू विजय गालेवाड, राहुल चंदेल, विठ्ठल मरवाळे, निलेश डोंगरे, परमेश्वर राठोड,अमर बायस यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी डॉ अण्णा गरड यांनी मार्गदर्शन करताना ,तुम्ही खेळत असलेल्या प्रत्येक खेळात तुम्ही उत्कृष्ट कामगिरी करुन राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करुन आपल्या महाविद्यालयाचे, विद्यापीठाचे, राज्याचे व देशांचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन करून राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या उपस्थितीना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर बायस यांनी केले तर आभार राहुल चंदेल यांनी मानले.
________________________

Post a Comment