लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (बाजीराव पाटील) :- उमरी नगर परिषद व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात भाजप मित्र पक्षांची बैठक आमदार राजेशजी पवार साहेब, भाजपचे नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरी शहरातील आ राजेश पवार साहेब यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन बैठक पार पडली.यावेळी अजित पवार गटाचे नेते डॉ विक्रम देशमुख तळेगावकर,शिंदे गटाचे नेते सुभाष पेरेवार,माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी साहेब, महंमद खाज्या महंमद सज्जन,संजीव विठ्ठलराव सवई, बापूसाहेब पाटील कौडगावकर, ग्रामीण तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वरराव पाटील सावंत, शहरी तालुकाध्यक्ष बालाजी पाटील ढगे,श्रीनिवास अंनतवार, अविनाश पाटील कदम, बालाजीराव माचेवाड, गंगाधर पाटील पुयड आधीच्या प्रमुख उपस्थित पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी प्रारंभी वरिल मान्यवरांच्या उपस्थितीत बंद दाराआड एक तास गुप्त बैठक होऊन पत्रकार परिषदेत *मालक नको चालक हवा* असे आमदार राजेश पवार साहेब यांनी उमरी नगरपरिषदेवर नगराध्यक्षासह भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांच्या 20 नगरसेवक यांना सर्व ताकदीनिशी निवडून आणुन पक्षांचा झेंडा फडकवू असे आमदार राजेश पवार यांनी सुतोवात करत दोन जिल्हा परिषद व पंचायत समिती, धर्माबाद नगरपरिषद व जिल्हा परिषद व पंचायत समिती वाटेल ते पर्यंत करून ताब्यात आणू.मी मागील पाच वर्षाच्या काळापासून आजपर्यंत उमरी व धर्माबाद तालुक्यात भरभरून निधी उपलब्ध करून देऊन प्रत्यक्ष काम करून दाखविलो नक्कीच मतदार आमच्या पाठीशी राहिल असा विश्वास आम्हाला आहे,मी आणि कवळे गुरुजी यांच्या सह सर्व उपस्थितांनी प्रतिष्ठा पणाला लावून बहुमताने निवडून आणू असा इशारा आ. पवार यांनी देत पुढे * *उमरी नगरपरिषदे मध्ये मुस्लिम समाजाचा उपनगराध्यक्ष राहणार आहे**.असे ठोस आश्वासन आमदारांनी देत शहरातील जनतेच्या हिताच्या दृष्टीकोनातून मुलभूत सुखसुविधा देण्यासाठी स्थानिक पातळीवर सत्ता आपली हवी.केंद्रात व राज्यात आपली सत्ता आहे .वाटेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ,उमरी मोढा मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आले,पुढे पालीका ची सत्ता आली की भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर यांच्या सह इतरांचे पुतळे उभारू तसेच सर्व जातीधर्माच्या जनतेसाठी वेगवेगळे येणाऱ्या काळात मंगल कार्यालय उभारू,रस्ते,पाणी, देऊच घरपट्या ही कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू, अनेक सुविधा पुरविणे हे माझे काम आहे .तसे जनतेने मला विश्वासाने निवडून दिल्यामुळे विकास कामे करीत आहोत.त्यामुळे पालीका आणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली सत्ता राहणे गरजेचे आहे त्यासाठी सत्ता आणून दाखवू असा विश्वास आमदारांनी पत्रकार परिषदेतून दिला.
मारोतराव कवळे गुरुजी
यावेळी कवळे गुरूजी यांनी ही आ. राजेश पवार यांनी केलेल्या विकास कामा बद्दल कौतूक करत अशोकराव चव्हाण साहेबांनी यांनी ही विकास निधी उपलब्ध करून दिले, तसेच आ राजेश पवार यांच्याही माध्यमातून दोन्ही तालुक्यात विकास कामे केले त्या विचारांने उमरी, धर्माबाद येथे सत्ता आणून भाजप पक्षांचा झेंडा फडकवू असे कवळे गुरुजी यांनी विरोधकांना आहवान देत माझे व आ राजेश पवार साहेबांचे कुठलेही राजकीय वैर नाही त्यामुळे आम्ही दोघेही एकाच पक्षाचे काम करीत असून. उमरी, धर्माबाद येथील न.पा.तसेच ग्रामीण भागातील जि.प.पं.स.निवडणुकीतील सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून आणू असा ठाम विश्वास पत्रकार परिषदेतून कवळे गुरुजी यांनी दिले,
माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी
यां वेळी उमरीचे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी स्थानिक बहुचर्चीत जिनिंग प्रेसिंग चा मुद्दा उपस्थित करीत जिनिंग प्रेसिंग च्या जागेवर उमरी शहरातील व तालुक्यातील बेरोजगारासाठी अद्यावत एम आय डी सी उभी करून सर्व सामान्य शेत कऱ्याच्या मुलांना व उमरी शहरातील व्यापाऱ्याना न्याय मिळायला पाहिजे यां माध्यमातून प्रयत्न केले जातील असे सांगितले.
अजित पवार गटाचे नेते डॉ विक्रम देशमुख तळेगावकर
--अजित पवार गटाचे नेते डॉ विक्रम देशमुख यांनी ही पत्रकार परिषदेतून बोलताना आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत युतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाच्या बाजूने राहणार असा प्रश्न आमदार राजेश पवारांना विचारला असता राजेश पवारांनी राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस डॉ विक्रम देशमुख यांना विचारा असे म्हणाले डॉ विक्रम देशमुख यांनी सांगितले कीं आमची मुळ राष्ट्रवादी ची टीम ने लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे काम केले आता येणाऱया निवडणुकीत सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर आपण आपले तालुका अध्यक्ष व सर्व टीम राजेश पवार यांच्या सोबदच राहू नवीन पक्षात येणाऱ्या लोंका बाबद आपल्याला किंवा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना कसलीही माहिती स्थानीक आयोजंकानी दिली नाही त्यामुळे कुणाचे प्रवेश होत आहेत याचीही माहिती नाही असे देशमुख यांनी सांगितले,
महंमद खाज्या महंमद सज्जन
मागील काळातील सत्ताधाऱ्यांनी आमच्या समाजासाठी हे करू ते करू नुसते आश्वासन दिले.निवळ मताचा उपयोग करून सत्ता उपभोगली परंतु भागाचे आमदार राजेश पवार यांनी जातीपातीचे राजकारण न करता आमच्या मुस्लिम समाज बांधवांसाठी भरपूर विकास कामे केले. यापुढे शादिखाना असो कि इतर कोणतेही विकास कामे असो यांनीच आ राजेश पवार साहेब यांनीच पुर्ण करतील तसेच आ पवार साहेबांनी पत्रकार परिषदेत मुस्लिम समाजाला उपनगराध्यक्ष देण्याचे घोषित केले. हि एक समाजासाठी जमेची बाजू आहे,मी निवडणूकीत मुस्लिम समाज नव्हे तर इतर माझ्या विचारांचे जेवढे काही मतदार बांधव असतील ते पुर्ण आमदार राजेश पवार साहेबांच्या पाठीशी राहतीलच. येणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष सह 20 नगरसेवक आमचे कसे निवडून येतील ते कसोटीने पर्यंत करणार असून आमचे नेते आ राजेश पवार साहेब यांच्या विचारांची उमरी नगर परिषद सत्ता राहिल अशी ग्वाही मुस्लिम समाजाचे नेते महमंद खाज्जा महंमद सज्जन यांनी दिले.
माजी नगराध्यक्ष सुभाषराव पेरेवार
सुभाष पेरेवार यांनी ही आम्ही सर्वाच आ पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीर आहोत असा विश्वास व्यक्त केले,यावेळी दिवाळी निमित्ताने आमदार राजेश पवार साहेबांनी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देत आपल्या लेखनातून जनते पर्यंत केलेले विकास कामे आणी काय करू इच्छितो अशी विनंती केली.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment