वाई (बा) जि.प. गटात प्रफुल जाधव ही उतरणार रिंगणात! ( जाधव यांची वाई बा. गटात भेटीगाठीवर भर ! )


लोकनेता न्यूज नेटवर्क

माहूर (राजकिरण देशमुख) :- जि.प.पं.स. निवडणुकांचे पडघम वाजण्यास जोरदार सुरवात झाली असून दररोज अनेक नवे नवे इच्छुक निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी करताना दिसत आहेत. गेल्या १० वर्षापासून गोर सेना या समाजिक संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी व सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तालुकाभर विविध प्रकारची आंदोलने करून तालुक्यात एक लढवय्या व अभ्यासू कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केलेले ईवळेश्वर येथील रहिवाशी गोर सेनेचे माजी तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांनी आपला मोर्चा वाई बा. या सर्वसाधारण असलेल्या जि.प. गटाकडे वळविला असून जि.प. गटात गावे, वाडी, तांडे, गुडयांत भेटी गाठी सुरु करून आपण निवडणूक रणसंग्रामातील एक शिपाई असल्याचा संदेश दिला आहे. प्रफुल जाधव यांनी गोर सिकवाडीचे मुखिया काशिनाथ नायक यांचा विचाराने प्रभावित असल्याने शेतकरी, कष्टकरी लोकांच्या न्यायासाठी गोर सेनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करून सर्वसामान्य नागरिकांची सेवा गेल्या १० वर्षापासून सातत्याने करीत आहे.व सदैव डोक्यावर बर्फ जिभेवर साखर घेऊन फिरणारा युवा नेता असल्याने तसेच सर्वधर्मसमभाव माननारा कट्टर पुरोगामी विचाराचा तरुण असल्याने तालुक्यात बंजारा समाजासह सर्वच जातीतील व धर्मातील नागरिकांशी सलोख्याचे संबध निर्माण झालेले. वाई बा. जि.प. गटातील सर्वच जाती धर्मातील मतदारांकडून वाई बा. निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात येत आहे. 

     माहूर शहरातील वसंतराव नाईक यांच्या नियोजित स्मारकाची जागा आरक्षित करणे, शेतकरी बांधवांचे प्रश्न कोणत्याही सर्वसामान्य नागरिकावर अन्याय होत असले तर गोर सेनेचे युवा नेते प्रफुल जाधव यांनी बुलंद आवाज उठवून न्याय मिळवून देतो, अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी आजवर अनेक अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून दिलेला आहे. व सदैव जनसेवेसाठी तत्पर असलेला सर्वसामन्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलने उभारून न्याय मिळवून देण्याचे काम सातत्याने करीत असल्याने विशेषतः तरुण वर्ग त्यांचेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जि.प. मध्ये आपला प्रतिनिधित्व करणारा नेता असाच असावा अशी चर्चा केली जात आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments