उमरी नगरपालिका निवडणुक प्रभाग क्रमांक १० येथे कॉर्नर सभा संपन्न; मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद



लोकनेता न्युज नेटवर्क

उमरी (प्रतिनिधी) :- उमरी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवार, दि. 29 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माझ्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये कॉर्नर सभा पार पडली. यावेळी मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला. 

तत्पूर्वी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. 

उमरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ. स्वप्नाताई श्रीराम माचेवाड तसेच प्रभाग क्रमांक - 10 चे नगरसेवक पदाचे उमेदवार सवई नागमणी किरण आणि अब्दुल समद अब्दुल लतिफ यांना येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरुपी आशीर्वाद देण्याची विनंती केली.

मतदार बंधू-भगिनींचा उत्स्फुर्त प्रतिसाद आणि भाजपच्या विकासाच्या विकासात्मक दृष्टीकोनावर त्यांनी बोलून दाखविलेला विश्वास, भाजपच्या विजयाची नांदी ठरणारा आहे.

यावेळी श्री. मारोतराव पाटील कवळे गुरूजी, सौ. पुनम पवार यांच्यासह उमरी शहरातील मतदार बंधू-भगिनी आणि भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments