बिलोलीच्या सर्वांगिण विकासासाठी वसई-विरारची बहुजन विकास आघाडी तैनात युवानेते विपुल पटणे यांच्या नेतृत्वाखाली बविआ पूर्ण ताकदीने लढणार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेशावेळी पटणेंचा निर्धार


लोकनेता न्यूज नेटवर्क

बिलोली (नबाजी कुडकेकर) :- तालुका बिलोलीच्या सर्वांगीण विकासासाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी मोठ्या इर्षेने मैदानात उतरली आहे. आज ठाकुरांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला त्यावेळी युवा नेते विपुल पटणे यांनी निर्धार व्यक्त करुन विजयी शंख वाजवला. पक्षप्रमुख हितेंद्र ठाकूर यांचे आशीर्वाद घेऊन विपुल पटणे हे नगराध्यक्ष पदाबरोबरच आपली टीम ताकदीने रिंगणात उतरवणार आहेत. पटणे हे स्वतः आपल्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीनिशी बिलोलीची खिंड जिद्दीने लढवणार आहेत. 

        मागील १५ वर्षांपासून ज्यांनी भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच केला, तरीही त्यांचा आत्मा अजूनही संतुष्ट झाला नाही, अशा जनविरोधी प्रवृत्तींकडून बिलोलीच्या विकासाची काय अपेक्षा करणार ? हा खरा सवाल आहे. एकाने चोरी केली तर दुसऱ्याने तरी सजग प्रहरी म्हणून वागायला पाहिजे होते. मतदार जनता आणि बिलोली शहराच्या विकासाप्रती बांधिलकी जपणे आवश्यक होते. परंतु खंबीर विरोधक म्हणून त्यांनीही आपले कर्तव्य निभावले नाही. त्यामुळे 'चोर चोर मौसेरे भाई' या भूमिकेत टेंबा मिरवणारे हे कथित नेते मागच्या १५ वर्षांत काडीचाही विकास करु शकले नाहीत, तर त्यांच्यावर आता तरी भरोसा काय म्हणून ठेवायचा, हा रोकडा सवाल कोणीही सूज्ञ नागरिक करु शकेल. किंबहुना त्यासाठीच 'बहुजनांचा विकास, हाच खरा ध्यास' हे स्वप्न उराशी बाळगून, लोकनेते हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी समस्त बिलोलीकरांच्या सेवेसाठी धावून आली आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments