किनवट|दशरथ आंबेकर :- तालुक्यातील मौजे इस्लापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक इर्शाद इब्राहिम पांडे , यांची नुकतीच बदली देवाची वाडी , येथे झाल्याने इस्लापूर येथील गावकरी तसेच शाळा व्यवस्थापनचे पदाधिकारी यांनी सदरील शिक्षकाची बदली थांबवावी अशी मागणी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड , यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
सविस्तर वृत्त असे की इस्लापूर सावरकरनगर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पांडे , यांची बदली देवाची वडी , ता . कंधार 'येथे झाली असून यांची बदली थांबवणे कारण गेल्या दोन वर्षापासून येथील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेच्या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर यश मिळवून दिले व शाळेची पटसंख्या दुपटीने वाढ केली तसेच शाळेची गुणवत्ता पाहता लोकसभागातून शाळेचा कायापालट केला इंग्रजी माध्यमातून मुलाचे मराठी शाळेत प्रवेश केले . सदरील शिक्षकाने जिल्हा परिषद शाळेविषयी लोकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन विकसित केला आहे . तरी या शिक्षकांमुळे येथील शाळेची गुणवत्ता सुद्धा चांगली आहे . सदरील शिक्षकाची बदली झाल्यास विद्यार्थ्यांचे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे अतोनात नुकसान होईल . सदरील शिक्षकाची बदली न थांबवल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात सदरील शिक्षकासाठी पालक व विद्यार्थ्यासह उपोषण करू असा ईशारा येथील माजी सरपंच सूर्यकांत बोधनकर ' पालक जगदीप हानवते , गौरव कदम , राम लंगोटे ,आदी पालकांनी निवेदनाद्वारे दिला आहे .
________________________

Post a Comment