लोकनेता न्यूज नेटवर्क
नांदेड :- जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीची दखल घेत लोककल्याणकारी शेतकरी नेते यांनी आज कुंचेली* गावातील पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान पूरग्रस्तांना तातडीने मदत पुरविण्यासाठी पुनर्वसन मंत्री व्याही मकरंद आबा पाटील तसेच माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला तसेच नांदेड जिल्हाधिकारी यांना तात्काळ सूचना दिल्या. तसेच सर्व शेतकरी व गावकऱ्यांना धीर देत, सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले..
________________________
Post a Comment