लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड | स्वाती सोनकांबळे :- इंदिरा गांधी हायस्कूल व जुनिअर कॉलेज चे विज्ञान विषयाचे जेष्ठ अध्यापक माधव किशनराव बामणे यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र यांच्या तर्फे दिला जाणारा राज्जस्तरीय शिक्षकरत्न नागरी पुरस्कार 2025 साठी निवड झाली आहे. बामणे सरांनी शिक्षण क्षेत्रात केलेले उत्कृष्ट अध्यापन, सामाजिक कार्यातील योगदान व प्रोढशिक्षणातील उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.
हा पुरस्कार त्यांना 5 सप्टेंबर 2025 शिक्षक दिनानिमित्त कुसुम सभागृह नांदेड येथे साडेअकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, उपाध्यक्ष्या अमिता ताई चव्हाण, सचिव डी.पी. सावंत, सहसचिव रावसाहेब शेंदारकर, खजिनदार उदयरावजी निंबाळकर, कार्यकारिणी सदस्य नरेंद्र दादा चव्हाण, पांडुरंगराव पावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच मुख्याध्यापक जी.एम. शिंदे, उपमुख्याध्यापिका वैशाली देशमुख, पर्यवेक्षक डॉ. अण्णासाहेब गरड, रमेशजी सज्जन, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवारातर्फे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
________________________

Post a Comment