भारतीय जनता पार्टीच्या आंबुलगा (गऊळ) मंडळ उपाध्यक्षपदी व्यंकटराव पाटील कळकेकर यांची निवड



लोकनेता न्युज नेटवर्क

कंधार (अविनाश कदम) :- भारतीय जनता पार्टी आंबुलगा (गऊळ) मंडळ उपाध्यक्षपदी व्यंकटराव पाटील कळकेकर यांची निवड करण्यात आली असून.कंधार तालुक्यातील कळका येथिल व्यंकटराव पाटील कळकेकर हे मुखेड कंधार चे विधानसभा सदस्य लोकप्रिय आमदार डॉ तुषारजी राठोड यांचे विश्वासू कार्यक्रर्ते असून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे निष्ठेने काम केले आहे.त्यामुळे त्यांची पक्ष विस्तारासाठी पक्षाचे ध्येय धोरण विधानसभेतील सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांची मंडळ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल संघटन मंत्री संजयजी कोडगे, भाजपा दक्षिण अध्यक्ष संतुकराव हंबर्डे,खुशालराव पाटील उमरदरीकर माजी नगराध्यक्ष गंगाधरजी राठोड,आ.डाॅ.तुषारजी राठोड,आंबुलगा मंडळ अध्यक्ष माधवराव मुसळे,पेठवडज सर्कल प्रमुख गोविंदराव केंद्रे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments