छ. संभाजीनगर (ज्ञानेश्वर बुधवत) :- स्कॉटलंड यार्ड स्टुडंट्स ब्रॅंड ॲंबेसेडर असलेले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजीनगर च्या अर्थशास्त्र विभागात कार्यरत आणि बुध्द-फुले-आंबेडकरी विचारांचा वारसा घेऊन त्यांच्याच प्रेरणेने सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तथा कलेच्या क्षेत्रात भरीव व सर्वसमावेशक प्रबोधनाच्या कार्याचा वसा घेऊन चालणाऱ्या प्रा. डॉ. संघर्ष सावळे यांनी उपरोक्त विधायक हेतूने स्थापन केलेल्या - साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छ. संभाजीनगर ( औरंगाबाद ) - च्या माध्यमातून अशा प्रबोधन कार्यक्रमांची अगदी थोडक्या काळात जणू मालिकाच सुरू केली असून नुकतेच मागील फेब्रुवारी, २०२४ मध्ये नेपाळ मधील काठमांडू शहरात अंतर्राष्ट्रीय कविसंमेलन तथा संत सेवालाल जयंती सोबतच उपरोल्लेखित विविध क्षेत्रातील मान्यवरांना अंतर्राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करून संपूर्ण देशभरंच नव्हे तर देशाबाहेर सुध्दा आपल्या सामाजिकतेची छाप उमटविली आहे. एवढेच नाही तर गेल्या वर्षापासून संस्थेच्या वतीने दरवर्षी बुध्द जयंती च्या निमित्ताने तथागत भ. गौतम बुध्दाचे विज्ञानवादी व मानवी कल्याणकारी विचार तळागाळातील जनमानसापर्यंत पोचविण्यासाठी आगळावेगळ्या साहित्य सोहळ्याचे आयोजन सुध्दा सुरू केले असून या २०२४ च्या मे - ०५ तारखेला ' चलो बुध्दकी ओर ' या नांवाने छ. संभाजीनगर येथे कवि संमेलन निश्चित केले आहे. दि. २७-०३-२०२४ रोजी बुलढाणा येथील हॉटेल नैवेद्यम येथे संस्थेच्या संयोजन समितीचे मान्यवर एकनाथ पाडळे - सामाजिक कार्यकर्ते तथा पी. आय्., बुलढाणा, आंबेडकरी चळवळीतील खंदे व निर्भीड तथा संशोधक सेनानी प्रा. एस्. पी. हिवाळे - बुलढाणा, अंतर्राष्ट्रीय ख्याती प्राप्त ज्येष्ठ कवी तथा समर्पित सामाजिक सेवेसाठी अमेरिकन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली, आयुष्मती मंदाताई भक्त - शेगाव, आयुष्मती अलकाताई बांगर - शेगाव, आयुष्मती वैशाली तायडे - खामगाव आणि
अंतर्राष्ट्रीय पर्यावरण पदाधिकारी तथा मानवाधिकार संघटनेच्या महाराष्ट्र महिला प्रमुख आयुष्मती शीतल शेगोकार ई. च्या समवेत झालेल्या बैठकीत डॉ. सावळे यांनी या संमेलनाची घोषणा केली असून डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली होऊ घातलेल्या या बहुचर्चित संमेलनाच्या उदघाटनासाठी छ. संभाजीनगर ( औरंगाबाद ) च्या समाज कल्याण आयुक्त मा. जयश्री सोनकवडे यांची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा, संस्था अध्यक्षांनी दि. ०५-०४-२०२४ रोजी संस्थेच्या मा. पदाधिकाऱ्यांच्या स्थानिक बैठकीत करून त्याच दिवशी, डॉ. संघर्ष सावळे यांनी, डॉ. विजयकुमार कस्तुरे, प्रा. प्रकाश शिरसाठ, कवी अंकुश पडघान व शीतल शेगोकार यांच्या उपस्थितीत, मा. जयश्री सोनकवडे यांची भेट घेऊन त्यांना, संस्थेच्या वतीने आयोजित या काव्य समारंभाच्या उदघाटनासाठी त्यांची निवड केल्याबाबतचे अधिकृत पत्र, प्रदान करून सदर सोहळ्यात सादर निमंत्रित सुध्दा केले. या प्रसंगी जयंती निमित्ताने परिसंवाद तसेच विविध क्षेत्रातील विशेषोल्लेखित कार्य करणाऱ्या बऱ्याच सेवाभावी व्यक्तिंना त्यांच्या कार्यासाठी संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती देऊन या सोहळ्यात बऱ्याच दिग्गज विद्वद्जनांना निमंत्रित करण्यात आल्याचेही डॉ. सावळे यांनी जाहीर केले.
_____________________________________
Post a Comment