24 सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाची मतदान टक्केवारी बघा सविस्तर





लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- आज (दि. 26) रोजी 05 बुलढाणा लोकसभा मतदार संघामध्ये मतदान सुरू असून. 24 सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात 336 मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे. मतदार संघात एकूण 3 लाख 14 हजार 78 मतदार, असून त्यामध्ये 1 लाख 64 हजार 629 पुरुष तर 1 लाख 49 हजार 449 इतक्या महिला आहेत. 

3 ते 5 आकडेवारी
       1 ते 3  वाजेच्या आकडेवारी नुसार मतदार संघात 53.31 टक्के मतदान झाले असून त्यामध्ये  90 हजार 101 पुरुष तर 77 हजार 346 महिलांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

1 ते 3 आकडेवारी
       1 ते 3  वाजेच्या आकडेवारी नुसार मतदार संघात 42.16 टक्के मतदान झाले असून त्यामध्ये 73 हजार 841 पुरुष तर 58 हजार 577 महिलांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

11 ते 1 आकडेवारी
       11 ते 1 वाजेच्या आकडेवारी नुसार मतदार संघात 31.47 टक्के मतदान झाले असून त्यामध्ये 58 हजार 451 पुरुष तर 40 हजार 404 महिलांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

9 ते 11 आकडेवारी
        9 ते 11 वाजेच्या आकडेवारी नुसार मतदार संघात 18.71 टक्के मतदान झाले असून त्यामध्ये 39 हजार 473 पुरुष तर 19 हजार 283 महिलांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 
 
7 ते 9 आकडेवारी 
          सकाळी 7 ते 9 वाजेच्या  च्या आकडेवारी नुसार 7.43 टक्के मतदान झाले असून त्यामध्ये  17 हजार 556 पुरुष तर 5 हजार 765 महिलांनी मतदान केले आहे.



     टिप :- आपण सर्वांनी लवकरात लवकर मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावावा ही नम्र विनंती. मतदान केवळ एक मत नसून आपला आवाज आहे. 


_____________________________________


0/Post a Comment/Comments