लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे तहसीलदारांनी पकडलेले टिप्पर कारवाई विनाच आहे. दरम्यान तलाठ्यांनी या संदर्भात पंचनामा करून तहसीलदाराकडे अहवाल दिला आहे. मात्र अजूनही है पंचनामा गुलदस्त्यांतच असून टिप्पर वर अद्याप पर्यंत कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत माहिती अशी की नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी मलकापूर पांग्रा येथे अवैध रेती वाहतूक करताना पांढऱ्या रंगाचे चार ब्रास चे टिप्पर पकडले होते. त्यानंतर तहसिलदारांनी तलाठ्यांना माहिती दिली, तलाठ्याने पंचनामा करून अवहाल तहसीलदाराकडे सादर केला असला, तरीही यासंदर्भात आठ दिवसाचा कालावधी लोटला तरी अद्याप देखील त्या टिप्पर वर कारवाई केली नसल्याने पाणी कुठे मुरते या संदर्भात प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्या टिपरवर अध्याप पर्यंत कारवाई कशामुळे झाली नाही, कारवाई थांबली तर रेती माफिया चे मनसुबे आणखी वाढतील. असा प्रश्न तालुक्यांतील नागरिकांना पडत आहे या संदर्भात जिल्हाधिकारींनी लक्ष घालून तात्काळ या टिप्पर वर गुन्हा दाखल करावे अशी मागणी जनतेतून होत असून नेमका आठ दिवसाच्या या कालावधीमध्ये कोणाच्या वरदहस्तामुळे हे प्रकरण दाबण्याचे काम हे अधिकारी करीत असल्याचा ही प्रश्न निर्माण होत आहे.
_____________________________________
Post a Comment