मतदार याद्यांचा बट्ट्याबोळ !

जिवंत व्यक्तीचा मतदान करण्याचा हक्क हिरावून घेतल्याचे चित्र....

सिंदखेड राजा तालुक्यातील 200 मतदार मतदानापासून वंचित

लोकनेता न्युज नेटवर्क

बुलढाणा (ज्ञानेश्वर बुधवत) :- एका बाजूला प्रशासन मतदानाचा टक्का वाढावा म्हणून विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहे. लोकांना मतदान करण्याकरिता परावृत्त करत आहेत आणि मतदान प्रत्येकाने केले पाहिजे तो आपला अधिकार आहे असेही सांगत आहे ,तर दुसरीकडे सिनखेड राजा मतदारसंघांमध्ये मतदार यादी मध्ये बट्ट्याबोळ बघायला मिळाला आहे.
        २६ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकी करता मतदान घेण्यात आले. सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथे एका वयोवृद्ध आजी जिने अनेक उन्हाळी पावसाळे अनुभवले अनेक प्रधानमंत्री पदाकरिता मतदान केले नेमके त्याच आजीचे नाव मतदान यादी मध्ये उपलब्ध होते मात्र त्यांच्या फोटोवर डिलीटेड चा शिक्का मारण्यात आला असल्यामुळे आजी मतदानापासून वंचित राहिल्या. त्या मतदान बुथ पासून परत माघारी घरी परतल्या, एवढेच नाही तर एक तरुणी 22 वर्षीप सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये मतदान करण्याकरता  बुथ वर आली मात्र त्या मुलीच्या मतदान नावापुढेच डिलीटेड चा शिक्का असल्यामुळे ती सुद्धा मतदानापासून वंचित राहिले,अशाप्रकारे 11 मतदाराच्या नावापुढे हा घोळ दिसला व ते मतदानापासून वंचित राहिले,तर सिंदखेडराजा तालुक्यामध्ये जवळपास 200 मतदार हे जिवंत असून सुद्धा केवळ डिलीटेड शिक्का मारल्यामुळे मतदानापासून वंचित राहिले, याबाबत उपविभागीय अधिकारी तथासायक निवडणूक निर्णय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की यावर आता कुठल्याही प्रकारचा उपाययोजना केल्या जाणार नाही त्यांना मतदान करता येणार नाही याद्या दुरुस्त करून यावर निर्णय घेतल्या जाईल,
मात्र ही उपाययोजना केली असती तर नक्कीच त्यांना मतदान केल्या गेले असते.
           मतदान यादीमध्ये जी व्यक्ती मतदान करणे करता आली त्या व्यक्तीचा नंबर त्या व्यक्तीचा फोटो सर्व व्यवस्थित होते फक्त डिलीटेड चा शिक्का होता मतदान केंद्रामध्ये अनेक उमेदवारांचे प्रतिनिधी उपलब्ध होते त्यांना जर मतदान करू द्यायची की नाही असे विचारणा जरी केली असती ते गावातील असल्यामुळे व ओळखीचे असल्यामुळे नक्कीच मतदार मतदानापासून वंचित राहिला नसता एवढं मात्र खरे,

मात्र मतदानापासून वंचित राहिल्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता.
__________________________________

0/Post a Comment/Comments