सिंदखेड राजा महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे ठिया आंदोलनलोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा(ज्ञानेश्वर बुधवत) :- तालुक्यातील माळ सावरगाव येथे चक्क गेल्या सात दिवसापासून लाईन नसून गावकरी व शेतकरी त्रस्त आहेत. ता.17 एप्रिल रोजी रात्री 9. 30 वाजता सिंदखेडराजा महावितरण कार्यालयासमोर गावकऱ्यांनी ठिया आंदोलन सुरू केले आहे.
सध्या प्रचंड उन्हाळा व उष्णतेचे दिवस असल्याकारणाने माळ सावरगाव येथील शेतकरी गेल्या सात दिवसापासून गावात वीज नसल्याकारणाने हैराण असून सतत महावितरण अधिकारी उपकार्यकारी अभियंता हिरालाल जांभुळकर यांच्याशी शेतकऱ्यांनी वारंवार वीज जोडून देण्या संदर्भात संपर्क केला. मात्र त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. अखेर नाईलाजाने माळसावरगाव गावातील तब्बल 100 गावकऱ्यांनी रात्री सिंदखेड राजा येथे येऊन महावितरण कार्यालयासमोर हे आंदोलन केले व महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.
माळसावरगावा कडे महावितरणचे जाणुन बुजुन दुर्लक्ष
आमच्या गावाकडे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच लाईनमन जानुन बुजून दुर्लक्ष करत असल्याचे सरपंच निवृत्ती कठोरे यांनी सांगितले. आम्हाला डावरगावावरुन लाईन न देता सिंदखेडराजा वरुन वीज पुरवठा जोडून दयावा अशी आमच्या सर्व गावकऱ्यांची मागणी असल्याचे ते म्हणाले.
_____________________________________
Post a Comment