सिंदखेड राजा(ज्ञानेश्वर बुधवत) :- तालुक्यामधील महावितरण हे नेहमी नागरिकांना त्रस्त ठरत आहे. वारंवार लाईट नसल्याने नागरिक त्रासाला देखील कंटाळले आहे. सिंदखेड राजाला लागून असलेल्या महारखेड येथील विद्युत केंद्रातून स्थानिक शेजारील सावखेड तेजन, हनवतखेड व इतर गावांना विद्युत पुरवठा केला जातो. पण नेहमी काही ना काही अडचणी सांगून नागरिकांना टाळण्यात येते. विद्युत पुरवठा सोईस्कर चालू असताना महारखेड विद्युत केंद्रवरील फोन हा नेहमी चालू असतो, पण ज्या वेळेला तासंतास लाईट बंद असते त्या वेळेला फोन हा कोमात गेलेला असतो अस नागरिकांन कडून एकायला मिळत. या परिस्थिती मध्ये नागरिकांनी काय करावं गावामध्ये लाईन नसल्याने बाल वृध्द सर्वांना या गोष्टीचा त्रास सहन करावं लागतो. सद्या उन्हाळा सुरू असल्याने तापमान जास्त असून नागरिकांना घरामध्ये उकडून निघत आहे. आणि अशात विद्युत पुरवठा का बंद आहे हे विचारण्यासाठी संपर्क केला असता फोन बंद राहत असल्याने करावं तरी काय हा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत आहे.
लाईन नसून बिल भरण्यासाठी नागरिकांना बरतंड घालण्यात येत. काही नागरिकांना मिटर बसवण्या अगोदर बिल आल्याचा प्रकार देखील तालुक्यात घडलाय.. अशा वेळेस नागरिकांनी करावं काय. मिटर नसले तरी बिल भराव का हा प्रश्न सर्वांन समोर निर्माण झाला आहे. नेहमी याच अडचणीचा नागरिकांना सामना करावा लागतो. पण या गोष्टीची महावितरण दखल घेऊल का? का नेहमी प्रणामे सामान्य नागरिकांन कडून पैसे उकळून आपलेच घर भरण्याचे काम करतील. अनेक वेळा सामान्य लोकांन कडून बिल भरू म्हणून पैसे नेण्याचे प्रकार घडलेत याला प्रकारांना सर्वस्वी कोण जबाबदार असेल. या सर्व अडचणींना तोंड देत नागरिक जगत असेल तर विद्युत केंद्राना बिल माघण्याचा कवडीमोल देखील हक्क नाही. असे प्रतिपादन विद्युत केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी केले...
__________________________________
Post a Comment