याला काय कार्यालय म्हणावे का?
आता अधिकारी पिवून येऊ लागलेत म्हणी.!
सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- मातृतीर्थ सिंदखेड राजा चे तहसिल कार्यालय नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. येथे कामकमी आणि लूट जास्त होत असल्याचे नियमीच ऐकायला मिळत असते. तहसिल कार्यालय हा सर्वच्या चर्चेचा विषय बनला आहे. आठवडा उलटला की एक झाले की एक अधिकारी कर्मचारी येथे काही न काही नागरिकांच्या काड्याकरून नागरिकांना लुटताना दिसतोय.
तहसिल कार्यालयातिल नोंदणी व मुद्रांक विभागात मोठ्या प्रमाणात नियमबाह्य काम सुरू असून दलालांचा सुळसुळाट झाला असल्याची माहिती समोर येत आहे. दलाल व स्थानिक कर्मचारी यांच्या आशीर्वादाने सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. या विभागात होत असलेली सामान्य जनतेची लूट थांबवण्यासाठी महसूल विभाग लक्ष देतील का?
नोंदणी व मुद्रांक विभाग दुय्यम निबंधक श्रेणी १ कार्यालय सिंदखेड राजा येथे तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन खरेदी विक्री करण्यासाठी व झालेल्या व्यवहारातील नकला काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट सुरू असून यावर लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित अधिकारी व खरेदी व्यवहार करणारे दलाल यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खरेदी व्यवहार होत असल्याने सामान्य जनतेची लूट तर अधिकार्यांची चांदी सुरू आहे तरी या कार्यालयात झालेल्या अवैध खरेदी विक्री व्यवहाराची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील जनता करीत आहे तरी या कार्यालयात झालेल्या अवैध खरेदी विक्री व्यवहाराची जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागात आता अधिकारी पिवून येऊ लागलेत म्हणी.!
ऩोदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयातील मुख्य अधिकारी हा कार्यालयीन वेळेत नशेत राहत असल्याचे समोर येत आहे. या कार्यालयाचा कारभार हा रामभरोसे सुरू आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करून जनतेला न्याय द्यावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.
तहसिल कार्यालय नागरिकांना लुटणारे बँक तर नाही ना?
येथे रोज नियमबाह्य पद्धतीने काम सुरू असल्याचे समोर येतच राहते. मागील महिन्यात झालेल्या तहसीलदार यांच्या कारवाई नंतर येथील अनेक प्रकरणे बाहेर येत आहे. शेतकऱ्याचे आदेश बनवणे असेल नोंदणी विभाग असेल, शेतकऱ्याचे पायदन वाटाचे विषय तर इतर विभागात नागरिकांची केवळ लुटच होत आहे. तहसिल कार्यालय हे का अधिकारी कर्मचारी यांच्या बापांनी पैसे छापण्यासाठी टाकून दिलेली बँक आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. तहसीलकार्यालयाला कोणी वाली नाही. कोणत्याही विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने येथे लूट करण्यास कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याला भीती निर्माण होत नाही असे स्पष्ट होते.
_________________________________
Post a Comment