हजारो तरुण-तरुणींना मिळणार रोजगार
अभिता फिल्म्स इंडस्ट्रीज चे सीईओ सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून साकारतेय पहिली चित्रपटसृष्टी
सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- बुलढाणा जिल्हाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात सिंदखेड राजाची ओळख राष्ट्रमाता जिजाऊंचे माहेर घर म्हणून ओळख आहे. आता मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळी प्रथमच सिनेमासृष्टी उभी राहत असून. मोती तलाव जवळ निसर्गरम्य ठिकाणी निर्माते सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून चित्रपटसृष्टी साकार होत असून. महिनाभरापासून असंख्य तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम मिळाले असून हजारो तरुणांना रोजगार ह्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.
चित्रपटसृष्टी च्या माध्यमातून प्रथमच आपल्या मायभूमीत निर्माते सुनील शेळके यांनी मोठे धाडस दाखवून जिजाऊंच्या जन्मस्थळ असल्याचे सिंदखेडराजा चित्रपटसृष्टीसाठी निवडले आहे. या चित्रनगरीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना विविध सिनेमांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होणार असून नवीन रोजगार ही उपलब्ध होणार आहेत. सुनील शेळके यांच्या कल्पक दूरदृष्टीकोनातून हा प्रकल्प उभा राहत असून या प्रकल्पामुळे सिंदखेडराजा नगरीतील वैभवात अधीक भर पडणार आहे .
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आमची अस्मिता असून या स्थळाचे जगभरात महत्त्व वाढवे म्हणून आमचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे निर्माते आणि अभीता फिल्मस चे सीईओ सुनिल शेळके त्यांनी सांगितले. भविष्यात याठिकाणी देशभरातील चित्रपटांचे चित्रीकरण केले जाईल. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचा लौकिक नक्कीच वाढेल, असेही ते बोलतांना म्हणाले, तसेच जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
Post a Comment