सिंदखेड राजा(ज्ञानेश्वर बुधवत) :- मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या नगरीमध्ये चालुक्य, यादव कालीन वास्तू आढळतात. राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी स्थळासमोर काम सुरू असताना पुरातत्व विभागाला शिव मंदिराचे अवशेष सापडले बहुदा हे मंदिर चालुक्य कालीन
असावे असे इतिहास अभ्यासकांचा प्रथमदर्शनी अंदाज आहे याचं परिसरात राम बारव नावाची बारव होती असा ऐतिहासीक दस्तावेजात उल्लेख आढळतो तरी या मंदिराचे सिंदखेड राजा नगरीतील ऐतिहासीक स्थळांचे उत्खनन व्हावे अशी मागणी सर्व इतिहास प्रेमींची आहे.
स्थानिक सिंदखेडराजा इतिहास अभ्यासक सुमित खांदवे पाटील, मयुरेश खेकाळे, लक्ष्मीकांत जावळे, ज्येष्ठ सिंदखेड राजा इतिहास अभ्यासक छगन झोरे हे सर्व मिळून या ठिकाणावर अभ्यास करून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे यांच्या या अभ्यासामुळे मातीआड ऐतिहासिक सिंदखेड राजा इतिहास सर्वांसमोर येईल.त्यामुळे सर्वच मंडळींची या परिसरात शास्त्रशुध्द पध्दतीने उत्खननाची मागणी करण्यात येत आहे.
तरी पुरातत्व विभागाने यात लक्ष द्यावे व ऐतिहासिक मातृतिर्थ सिंदखेरा जाचा मातीआड असलेला अपरिचित इतिहास जगासमोर आणावा.
__________________________________
Post a Comment