छत्रपती संभाजीनगर :- आंबेडकर चळवळीतील अग्रणी नेते, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री मा. श्री. गंगाधर सुखदेव गाडे (76) यांचे आज सकाळी 4.30 वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवार दिनांक 5 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सौ सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धांत गाडे, सून डॉ. भावना वंजारी गाडे, बहिण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, नातवंडे असा परिवार आहे.
_____________________________________

Post a Comment