सिंदखेड राजा नगरपालिकेने रस्त्यावरचे अतिक्रमण हटवले !

रस्त्यानी मोकळा श्वास घेतला मात्र निरोगी वायू कधी मिळणार ? 

लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- मातृतीर्थ तालुका म्हणून सिंदखेड राजा शहराचं नाव संपूर्ण भारत देशामध्ये आदराने घेतले जाते. याचं मुख्य कारण म्हणजेच राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचा सिंदखेड राजा असलेले जन्मस्थळ. यामुळेच संपूर्ण देशभरामध्ये सिंदखेड राजा शहराचे नाव आदराने घेतले जाते परंतु मातृतीर्थ तालुका असूनही सिंदखेड राजा शहराचा पाहिजे तसा विकास झाला नाही, याची खंत नेहमी सर्वांच्या मनात आहे. 
             राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून हजारो अनुयायी सिंदखेड राजा येथे येत असतात. परंतु येथे आल्यानंतर मुख्य जो महामार्ग आहे सिंदखेड राजा ते मेहकर या महामार्गावर सिंदखेड राजा तहसील पासून तर राजवाड्यापर्यंत अनेक छोट्या मोठ्या दुकानदाराने आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकान थाटली आहेत. दुकाने तर आहेच परंतु रस्त्या जवळच अनेकांनी समोर तीन पत्रे सुद्धा टाकलेली आहे, त्यामुळे वाहनधारकांना वाहने उभे करण्याकरता जागा शिल्लक नसल्याने वाहने अस्ताव्यस्त कुठेही उभे राहत असत,त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण व्हायचा,परंतु सिंदखेड राजा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत व्हटकर यांनी धडक मार्ग अवलंबून रस्त्यालगत असलेले अतिक्रमण जेसीबी च्या साह्याने व पोलीस संरक्षणाच्या माध्यमातून नगरपालिकेचे कर्मचारी सोबत घेऊन काढून टाकले आहे,त्यामुळे रस्त्याने आता थोडाफार का होईना मोकळा श्वास घेतला आहे,,
            यामुळे टपरीधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अनेक टपरीधारकांनी आपला छोटा मोटा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याठिकाणी भागवत आहेत,त्यामुळे ज्याची टपरी उठवली आहे अशांना नगरपालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सुद्धा होत आहे,यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी तसेच सिंदखेड राजा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

चौकट

ठीक ठिकाणी असलेल्या घाणीच्या सम्राज्याचे काय?

मुख्य अधिकारी प्रशांत व्हटकर या कडे लक्ष घालतील का?

      मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरपालिकेने रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्यानंतर आता रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले आहे. परंतु तो श्वास निरोगी असायला हवा . शहरं स्वच्छ व सुंदरच असायला हवे. परंतु शहरामध्ये अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या दुर्गंधीमुळे नागरिक श्वास तर घेतात पण तो निरोगी आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. अनेक ठिकांनी नाल्यामध्ये पाणी सडून त्याची दुर्गंधी सुटली तर काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले आहे. या वर आता मुख्य अधिकारी प्रशांत व्हटकर लक्ष घालतील का? की अतिक्रम काढल्या नंतर जैसे ते होणार नाही ना... अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
_____________________________________


0/Post a Comment/Comments