भरधाव वेगात सुटलेली चिंतामणी लक्झरी पलटली, सावखेड तेजन फाट्याजवळील घटना!

१७ प्रवासी किरकोळ जखमी



लोकनेता न्युज नेटवर्क

सिंदखेड राजा/ज्ञानेश्वर बुधवत  :- पुणे येथून नागपूरकडे भरधाव वेगाने जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची घटना दि ७ जूनच्या सकाळी ५ वा ३० मि घडली, सदर चिंतामणी ट्रॅव्हल्स क्र . एपी ०६ ए ९७४२ या क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स असून रवी रामचरण राठोड वय ३८ वर्षे रा .रेवणसिद्ध तांडा तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली व दुसरा चालक अमोल ज्ञानदेव सातोरे कसुरा तालुका बाळापूर जिल्‍हा अकोला हे आळीपाळीने ट्रॅव्हल्स चालवायचे ,सदर सावखेड तेजन फाट्यावर सदर चालकाला डूलकी आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॅव्हल्स पलटी झाली सुदैवाने ट्रॅव्हल्स मधील 34 पैकी 17 प्रवाशांना किरकोळ मार लागल्यामुळे ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा येथे त्यांना उपचारासाठी भरती करण्यात आले ,सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही,तर उर्वरित १७ जण सुखरूप आहे,जखमी मध्ये योगेश गणेश शेंदुरकर राहणार कोठारी तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम,दिनेश मधुकर राठोड राहणार पिंपळखुटा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ, संदीप बाबू सिंग राठोड राहणार पिंपळगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ,प्रीतम संतोष पडघान, राहणार आडोळी तालुका जिल्हा , वाशिम ,अंकुश प्रल्हाद पोहाणे राहणार कवठळ तालुका मंगरूळ बीड जिल्हा वाशिम,सुनील मोहन पवार राहणार वार्डाखेर्डा तालुका मानोरा जिल्हा वाशिम,वैष्णवी पुरुषोत्तम अंभोरे राहणार सावरखेड तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला,उज्वल पुरुषोत्तम अंभोरे राहणार सावखेड तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला,सौरव विजय कोल्हे राहणार शिवणे तालुका पुसद जिल्हा यवतमाळ,सुरेश मानसिंग जाधव भोईनी तालुका मानोरा जिल्हा वाशिम,स्वराज राम राठोड राहणार सावरगाव तालुका मानोरा जिल्हा वाशिम,सदाशिव विष्णू निकष राहणार सावत्रा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा, प्रतीक्षा सदाशिव निकष राहणार सावत्रा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा,सरस्वती गजानन गायकवाड राहणार वाशिम,मिनाबाई भारत कांबळे राहणार वाशिम,अविनाश भीमराव मोरे राहणार शहापूर जिल्हा वाशिम,दिपाली अविनाश मोरे राहणार शहापूर जिल्हा वाशिम अशी किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांची नावे असून सदर प्रवासी हे बुलढाणा यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील आहेत,यावेळी घटनास्थळी ग्रामस्थांनी व पोलिसांनी तातडीने धाव घेऊन प्रवाशांना गाडीतून बाहेर काढले.

__________________________________

0/Post a Comment/Comments